shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केसापूर येथे भेंडी वाण पिक पाहणी व चर्चासत्र संपन्न..!


राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. २६-५

 राहुरी तालुक्यातील कृषी संपन्न असलेल्या केसापूर येथे औरंगाबाद येथील अजित सिड्स प्रा. लि. यांच्या वतीने ‘अजित रॉयल’ या भेंडी वाणाचा पिक पाहणी  व चर्चासत्र कार्यक्रम मोठ्या उत्चाहात संपन्न झाला. यावेळी कंपनीचे आर.एस.एम दिनेश केलार व गोरख चांडे हे उपस्थित होते.

यावेळी कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना अजित सिड्सच्या विविध उत्पादनांची माहिती दिली. दर्जेदार बियाणे वापरणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांची ही गरज ओळखून अजित रॉयल सारख्या भरघोस उत्पन्न मिळऊन देणाऱ्या वाणाची निर्मिती कंपनीने केली आहे अशी माहिती गोरख चांडे यांनी दिली. याप्रसंगी चर्चासत्रात पंचक्रोशीतील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी टाकसाळ पाटील ऍग्रोचे संचालक विलास टाकसाळ, साई प्रवरा शेतकरी कंपनीचे सचिव माजी उपसरपंच दादासाहेब मेहेत्रे, संजय बोल्हे, केशव टाकसाळ, धनंजय टाकसाळ, उत्तम मेहेत्रे, सुभाष टाकसाळ, राहुल गायकवाड, गणेश टाकसाळ, गोकुळ हिंगे, साहेबराव टाकसाळ, रामभाऊ महाडिक, रवी हिंगे, संजय पुजारी, नवनाथ बोल्हे,बापूसाहेब मेहेत्रे, उत्तम थोरात, सचिन शिंदे, भगवान डुकरे, योगेश टाकसाळ, राहुल म्हसे यांसह पंचक्रोशीतील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

केसापूर : येथे शेतामध्ये अजित रॉयल या भेंडी वाणाची पिक पाहणी करताना कंपनीचे पदाधिकारी व शेतकरी.
close