राजकुमार जाधव..
शिर्डी..
श्री साईबाबांचे निस्सीम साईभक्त बाबासाहेब तर्खडांची एकदा भुताशी गाठ पडली.आणी त्यांनी मदतीसाठी बाबांचा धावा केला.स्वतःच्या रक्षणासाठी जवळ उदी नसल्याने त्यांनी त्या भुतावर चक्क माती उचलून फेकली आणी साईबाबांची प्रार्थना केली असता क्षणार्धात ते भुत
पिशाच्च नाहिसे झाले.होय हि सत्य घटना घडली आहे. आजही शिर्डीच्या पुण्यनगरीतील माती मौल्यवान आहे.याबाबत थोडक्यात मागोवा..!
मित्रांनो नमस्कार. !! ओम साई राम !!
सदगुरु श्री साईनाथ महाराज कि जय...
साईबाबांच्या आपण अनेक घटना, चमत्कार, लिला बघत आहोत.साईबाबांच्या पदस्पर्शाने शिर्डीतील मातीत देखील पाँवर आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर एके दिवशी भल्या पहाटे बाबासाहेब तर्खड हे नाल्याच्या किनारी पिंपळाच्या झाडाखाली बसून नैसर्गिक विधी करत होते.त्यावेळी थोडा अंधारच होता.तोच त्यांच्या दृष्टी समोर एक वन्य कोंबडा दिसला. तो आरवत होता पण त्याचा आरवण्याचा आवाज खूप विचित्र होता.जो तर्खडांनी यापूर्वी कधीही ऐकला नव्हता.त्या वन्य कोंबड्याने त्यांचे चित्त स्वतःकडे वेधून घेऊन त्याला बघू लागले.आणी एकदम तो कोंबडा एका काळ्या रंगाच्या सापामध्ये रुपांतरीत झाला.तो साप उठला आणि तेथे उभा राहिला. त्याने आपला फणा उगारला.श्री तर्खड खुप घाबरले आणी बाबांच्या मदतीकरता प्रार्थना करू लागले.काही वेळानंतर तो साप तेथून अदृश्य झाला. त्यांनी घाईघाईने आपला नैसर्गिक विधी उरकून त्या जागेवरून पळून जाण्याचा निश्चय केला.तसे करत असतांंना त्यांनी कोणाला तरी असे बोलतांंना ऐकलेे "ए माणसा, तू माझ्या वाटेत बसला आहेस, जेथून मी रोज जातो. मी तुला माझ्या वाटेतून दूर जाण्याचा आदेश देतो.असे म्हणताच काही क्षणातच एक बुटका कुरूप दिसणारा माणूस त्यांच्यासमोर उभा राहिला.तो बुटका माणूस उंच उंच वाढू लागला आणी म्हणाला "तू मला ओळखले नाहीस का ? मी वेताळ आहे, आणी ही माझी जागा आहे. मी पुन्हा एकदा तुला येथून दूर जाण्याचा आदेश देतो.बाबासाहेब तर्खडांनी मग मुठभर माती उचलली आणि बाबांचं नांंव घेत त्या उंच उभ्या असणाऱ्या वेताळावर फेकली आणी बाबांना त्यांच्या बचावाकरिता येण्याकरीता प्रार्थना केली.त्यांना वेताळाच्या जागी धुराची एक मोठी रेघ दिसली. वेताळ हवेतल्या हवेत नाहीसा झाला होता. हे बघून बाबासाहेब त्या जागेवरून पळून गेले. आंघोळ केल्यावर आणि न्याहारी घेतल्यावर ते द्वाराकामाईत गेले.जेव्हा ते बाबांच्या चरणांपाशी आले तेव्हा त्यांनी बाबांनी त्यांना विनोदाने विचारतांंना ऐकले, "ए भाऊ आज भल्या पहाटे, तू माझ्या उदीची मदत का मागत होतास ? असे म्हणताच श्री तर्खड साईबाबांच्या चरणांवर नतमस्तक झाले. जे काही घडले होतं ते सर्व काही सांगितलं. त्यांनी बाबांना सांगितलं की त्यांच्याकडे त्यांची उदी नव्हती म्हणून त्यांनी शिर्डीची (बाबांच्या कर्मभूमीची ) माती उचलली आणि ती उदी आहे असे मानत ती वेताळावरती फेकली. हे ऐकल्यावर बाबा म्हणाले "भाऊ, तू आज एक चांगलं काम केलं आहे. त्या वेताळाला तू मुक्ती दिली आहेस.बाबांची परवानगी घेऊन त्यांनी बाबांना प्रश्न केला की, हे भूत डाकिणी इ. जगात खरेच असतात का ? बाबा उत्तर देत म्हणाले "भाऊ, ही सुद्धा भगवंताची निर्मिती आहे.पण लक्षात ठेव की वाचवणारा हा नेहमी मारणाऱ्यापेक्षा शक्तिशाली असतो.मी इथे पवित्र द्वारकामाईमध्ये बसलो असतांंना, कोणी तुला इजा करू शकत नाही.एकंदरीतच साईबाबांचे आपल्या सर्व भक्तांवर जिवापाड प्रेम होते. आणी बाबा आपल्या भक्तांचे द्वारकामाईत बसून रक्षण करत होते.
!!ओम साई !! जय साई !!

