कौठळीच्या सरपंच पदी सौ. राणी हिरामण मारकड यांची बिनविरोध निवड.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील कौठळी गावच्या सरपंच पदी दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या निवडीमध्ये सौ. राणी हिरामण मारकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कौठळी गावच्या सरपंच पदाचा सौ. नंदा बाळू चोरमले यांनी राजीनामा दिल्याने झालेल्या रिक्त जागेवर दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सौ. राणी हिरामण मारकड यांचा एकमेव सरपंच पदासाठी अर्ज दाखल झाल्याने सदर सरपंच पदी सौ. राणी हिरामण मारकड यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी व सर्कल शहाजी राखुंडे यांनी घोषित केले.
यावेळी तलाठी सरिता मरजकोल्हे, ग्रामसेवक संतोष मोहिते, उपसरपंच सुनील बिरा खामगळ,ग्रामपंचायत सदस्य सौ. रुपाली नामदेव मारकड,सौ. सोनाली अनिल पवार,सौ. नंदा बाळू चोरमले,सौ दीक्षा अण्णा काळेल,संदिपान गणपत मारकड,बापू उत्तम चितारे हे उपस्थित होते.
यावेळी रा. काँ. पुणे जिल्हा सरचिटणीस वसंत मारकड, रा. काँ. सोशल मीडिया प्रमुख हमा पाटील, रामभाऊ पाटील, बाळासाहेब मारकड, सुभाष शिंदे, गुणवंत मारकड ,विठ्ठल मारकड, सुभाष पिसाळ, भारत चोरमले ,हनुमंत वाघमोडे, संतोष खांडेकर ,प्रभाकर कर्चे, अशोक मारकड, नामदेव पाटील, अनिल पवार, अण्णा काळेल, कालिदास पाटोळे, रमेश काळेल, गजेंद्र काळेल ,अशोक राऊत, ज्ञानदेव खांडेकर, प्रकाश मारकड, बापूराव खांडेकर, राहुल पाटील, बिट्टू पिसाळ, ज्ञानेश्वर मारकड, गणेश मारकड, संतोष राऊत व इतर ग्रामस्थ यावेळी उपस्थित असल्याची माहिती हिरामण मारकड यांनी दिली.
यावेळी हिरामण मारकड म्हणाले की माझी पत्नी सौ. राणी मारकड यांना सरपंच पदी बिनविरोध निवड केल्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील मान्यवर ग्रामस्थ व समस्त ग्रामस्थ यांचे मनःपूर्वक आभार मानतो. तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या असून यांच्या सहकार्याने कौठळी गावाच्या विकासासाठी नव नियुक्त सरपंच सौ. राणी मारकड यांच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न करूया असे मत व्यक्त केले.

