shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रमजान ईद व अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप शुभेच्छा- अनिताताई खरात.

रमजान ईद व अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप  शुभेच्छा- अनिताताई खरात.
इंदापूर प्रतिनिधी:समाजात वावरत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन अखंड भारताचा विकास व्हावा या दृष्टीने हिंदू-मुस्लीम भाई भाई असा उद्देश ठेवून चालले पाहिजे. जात धर्म यापेक्षा सर्वात मोठी  माणूस हिच जात आहे हे वाक्य कायम स्मरणात ठेवून कोणीही जाती धर्मात तेढ निर्माण होईल असे वागू नये असे तेजपृथ्वी ग्रुपच्या  अध्यक्षा अनिताताई खरात म्हणाल्या .

ज्यावेळेस आपणास अचानक काही अडचण येते कोणते संकट आपल्यावर ओढवते  त्यावेळेस आपणास फक्त मदत पाहिजे असते  मग तो हिंदू असो मुस्लीम असो त्यावेळेस आपणास कोणाची ही मदत चालते मग जाती धर्म का पाळावा  जात महत्त्वाची नसून माणुसकी हा एकच धर्म महत्वाचा आहे . आणि हे सर्व  कोरोनो काळात आपण शिकलो आहे . म्हणूनच माणूस आणि माणुसकी हीच श्रेष्ठ समजून सर्वांनी गुण्यागोविंदाने रहावे असे मी तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने आव्हान करते.
 तसेच साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया व पवित्र आसा  रमजान ईद एकाच दिवशी येऊन खरच हिंदू मुस्लिम भाई भाई हे परमेश्वराने ही  आपणास दाखवून दिले आहे.

तेजपृथ्वी ग्रुप कायम महेंद्र रेडके, पांडुरंग  मारकड, नानासाहेब खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन काम करेल अशी मी आपणास तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीन ग्वाही देते तसेच तेजपृथ्वी ग्रुपच्या सर्व सदस्यांकडून रमजान ईद व  अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा . आपले सर्वांचे आयुष्य निरोगी सुखी समृद्ध होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना!
close