shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर सराफ सुवर्णकार समाज संघटनेची कार्यकारिणी जाहीर



श्रीरामपूर (शौकतभाई शेख): - येथील सराफ सुवर्णकार समाज संघटनेची नवीन कार्यकारिणी संघटनेचे अध्यक्ष स्वामीराज कुलथे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. 

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत स्वामीराज कुलथे यांनी समाजातील नवीन युवक कार्यकर्त्यांना संधी देऊन समाजाच्या जडणघडणीत सर्वांनी जोमाने कार्य करून समाजाला उंचीवर नेण्यासाठी काम करावे असे सांगितले. 

या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी मंगेश लोळगे, मनोज नागरे, कार्याध्यक्षपदी निखिल नागरे, संतोष उदावंत, सचिवपदी सतीश नागरे, श्रीपाद बोऱ्हाडे, संघटकपदी सचिन अहिरराव,ओम महाले, खजिनदारपदी सचिन मुंडलिक, आकाश मैड, संपर्कप्रमुखपदी
महेश माळवे, नितीन चित्ते, प्रसिद्धी प्रमुखपदी सुधीर लोळगे, स्वप्नील सोनार, स्वागताध्यक्षपदी सुनील मालेगांवकर,संतोष उदावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून 
अजिंक्य नागरे, गौरव महाले, योगेश मुंडलीक, गजानन मुंडलीक, महेश महाले, प्रणव बोऱ्हाडे, प्रतीक बोकण, समर्थ बोऱ्हाडे, अक्षय नागरे, निलेश काजळे, नंदू डहाळे, कृष्णा लोळगे, रवी मैड, राजकिरण माळवे, अभिजीत माळवे, विकी मुंडलीक, कुणाल चापाणेरकर, अमोद मुखेडकर यांची निवड करण्यात आली. 

या नवीन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा लवकर घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष स्वामीराज कुलथे यांनी दिली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल सर्व समाज बांधवांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
close