इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व जागावर निवडणुका लढवणार - स्वप्नील सावंत.
इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठकीत झाला निर्णय.
इंदापूर प्रतिनिधी:आज इंदापूर येथे इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्षवाढीसाठी सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय झाला. येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकी मध्ये समाजामध्ये काम करणारे स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना पक्ष संधी देईल त्याचबरोबर होतकरू युवकांचा देखील पक्ष विचार करेल.तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाचे दिग्गज नेते हे इंदापुर मध्ये येणार आहेत. आज पर्यंत काँग्रेस पक्षाने सर्वसामान्यांसाठी केलेल्या कामाच्या जोरावरती लोकांच्या पुढे जाऊ . सध्य स्थितीत देशाला काँग्रेसची गरज आहे असे मत इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी मांडले.
ही बैठक इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली .या बैठकीसाठी तालुका काँग्रेस कमिटीचे कार्यअध्यक्ष काकासाहेब देवकर, उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर , जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जाकीर भाई काझी, इंदापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चमन भाई बागवान, किसान काँग्रेस सेलचे तालुका अध्यक्ष डॉ संतोष होगले , महादेव लोंढे, निवास शेळके , भगवान पासगे, श्रीनिवास पाटील, आकाश पवार, युवराज गायकवाड, शिवाजी आहेर आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते

