श्रीरामपूर (शौकतभाई शेख) :- पवित्र रमजान निमीत्त सर्वत्र इफ्तार पार्टीचे आयोजन केले जात आहे. मात्र लोयोला चर्चने एक आगळा-वेगळा कार्यक्रम घेऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
काल दिनांक १ मे २०२२ रोजी लोयोला धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फा. ज्यो. गायकवाड यांच्या संकल्पनेतून व ऍड. समीन बागवान आणि रवींद्र त्रिभुवन यांच्या पुढाकारातून मुस्लिम बांधवांना लोयोला चर्चमध्ये निमंत्रित करण्यात आले होते. या इतर पार्टीमध्ये श्रीरामपूर शहरातील बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी आनंदाने सहभाग नोंदवला. चर्चमध्ये या ऐतिहासिक इफ्तार पार्टीचे आयोजन करून ख्रिस्ती बांधवांनी सामाजिक ऐक्याचा कृतिशील संदेश दिला. यावेळी सेंट झेवियर शाळेचे प्राचार्य फा. टायटस थंगराज, फा. मॅथयू व फा.सावरी यांनी उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रमुख धर्मगुरू फा. ज्यो. गायकवाड म्हणाले की, भारतीय संविधान हा देशाचा सर्वोच्च ग्रंथ आहे. त्याला अनुसरून आपल्यालापुढील काळात आचरण ठेवावे लागेल. सामाजिक सलोखा जपताना भारतीय नागरिक केंद्रस्थानी ठेवावा लागेल. हिंदू,मुस्लिम, शीख,ईसाई,जैन व बौद्ध असे सर्वच धर्म दया, क्षमा, शांतीचा व ऐक्याचा संदेश देतात. धर्म माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही हे लक्षात ठेवावे लागेल.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. समीन बागवान यांनी तर आभार रविंद्र त्रिभुवन यांनी मानले.
यावेळी मा.नगरसेवक हाजी अंजुम शेख,मुक्तार शहा, ऍड. शफी शेख,ऍड वाय.के शेख, सलीमखान पठाण, डॉ. तोफिक शेख, डॉ. मुजाहिद सय्यद, डॉ. अदनान मुसानी,डॉ. सलीम शेख, मेहबुब कुरेशी, कलीम कुरेशी, साजिद मिर्झा,फिरोज दस्तगिर, ऍड.फिरोज इनामदार, ऍड. आरिफ शेख, अजीज शेख सर, फारुख पटेल सर, मुस्ताक शेख सर, इकबाल काकर सर, यासीन सय्यद सर, अल्ताफ शेख मेजर, आसिफ शेख, ऍड. एजाज पठाण, सोहेल शेख, ऍड. आरिफ शेख, ऍड. मंजूर शेख, हाजी अब्दुल लतीफ शेख, कॉ.जीवन सुरुडे, नईम शेख, शरीफ शेख, जावेद पठाण, मेहबूब प्यारे शेख, अबुजर पठाण, फय्याज ईनामदार, श्रीकृष्ण बडाख, इरफान बागवान, डॉ. तोफीक एकता, आरिफ पटेल, हे उपस्थित होते.
याप्रसंगी गुलाबपुष्प देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवक प्रतिनिधी कमलाकर पंडित,उत्तम गायकवाड, विजय त्रिभुवन, राकेश दुशिंग,विजय शेळके, रविंद्र त्रिभुवन,अक्षय माघाडे, प्रतिक गायकवाड, संदीप आढाव, जितेंद्र त्रिभुवन, वैभव माघाडे आदींनी परिश्रम घेतले.

