shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखिल भारतीय काँग्रेस आय ने केले रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन


प्रतिनिधी : सचिन जव्हेरी

करमाळा : ३ / पवित्र रमजाण महीन्या निमित्त अखिल भारतीय काँग्रेस आय करमाळा ओ.बी.सी विभागाचे तालुकाध्यक्ष  ज.गफुरभाई शेख यांच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन वाशिंबे येथे करण्यात आले.

यावेळी करमाळा कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे उपसभापती  चिंतामणी (दादा)जगताप, ओ.बी.सी.विभागाचे जिल्हाध्यक्ष  राजाभाऊ रुपनवर, करमाळा तालुकाध्यक्ष  प्रतापराव जगताप, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वाघमोडे,अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष  दस्तगीर पठाण,करमाळा तालुका संघटक  संभाजी शिंदे, तालुका सचिव जैन्नुद्दिन शेख, ता.अल्पसंख्यांकचे उपाध्यक्ष साहील सय्यद, ओ.बी.सी. शहराध्यक्ष अक्तर सय्यद, तालुका उपाध्यक्ष प्रताप खाडे व अशोक घरबुडे, शुभम देशमुख, दादासाहेब पवार, धर्मराज शिंदे,तालुका संघटक रणजीत कांबळे. अंगद बाबर, दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन रामदास झोळसर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब झोळ,प्रगतशिल बागायतदार  जगन्नाथ जगदाळे,भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास बप्पा झोळ, माजी सरपंच भगवान अण्णा डोंबावे,वि.का.सेवा सोसायटीचे चेअरमन कांतीलाल झोळ, प्रसिद्धी प्रमुख अमोल पवार, नितीन चोपडे, सुजय जगताप,आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस आय ओ.बी.सी. विभागाच्या निवडी करण्यात आल्या.दिपक ननवरे यांची ओ.बी.सी विभागाच्या तालुका सरचिटणीसपदी तर इक्बाल शेख यांची ओ.बी.सी. विभागाच्या तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या निवडीचे पत्र ओ.बी.सी.विभागाचे जिल्हाध्यक्ष  राजाभाऊ रुपनवर व करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या शुभहस्ते देण्यात आले.यावेळी सर्व मुस्लीम बांधवांना ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ अण्णा झोळ,नियाज शेख,अस्लम शेख,इन्नुस शेख,अरहान शेख,युवराज झोळ,असिफ शेख,प्रकाश ढवळे,अंगदनाना झोळ,आनंद भैय्या झोळ,अमित देशमुख यांनी परिश्रम घेतले.
close