शिक्षक समितीच्या वतीने डॉ सौरभ भोंग यांचा सत्कार.
डॉ सौरभ भोंग यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून झाले.
इंदापूर प्रतिनिधी:
दि २१ निमगाव केतकीचे रहिवशी असलेले प्राथमिक शिक्षकपदी उत्कृष्ट काम केलेले पुणे जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत भोंग व आदर्श शिक्षिका प्रभावती भोंग यांचे चिरंजीव डॉ सौरभ भोंग याने शासकीय मेडिकल कॉलेज मिरज येथून एमबीबीएस पदवी प्रथम श्रेणीत मिळवून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शिक्षक समितीचे वतीने डॉ सौरभ भोंग व आई वडिलांचा फेटा , श्रीफळ पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.
डॉ सौरभ यांनी सांगितले की , पुढील वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून निमगाव केतकी सारख्या ग्रामीण भागात अद्ययावत हॉस्पीटल उभारून चांगल्या प्रकारे रूग्णाची सेवा करणार आहे.
यावेळी पुणे जिल्हा पतसंस्थेचे माजी चेअरमन अरूण मिरगणे , शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष भारत ननवरे , अजिनाथ आदलिंग , भारत ननवरे , किरण लंगोटे , नंदकुमार सूर्यवंशी , जुनी पेन्शन इंदापूर अध्यक्ष संतोष हेगडे , मधुकर भोंग , चंद्रकांत भोंग व प्रभावती भोंग उपस्थित होत्या.

