shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गणेगाव येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी अंजाबापू कोबरणे तर व्हाईस चेअरमन पदी लिलाबाई कोबरणे यांची निवड

राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. २१-५

     गणेगाव सोसायटीची नोटीस निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली यानंतर चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या निवडी जाहीर झाल्या आहे. यामध्ये चेअरमन पदी अंजाबापू सखाराम कोबरणे यांच्या नावाची सूचना संचालक कैलास नारायण कोबरणे यांनी दिली तर त्यास विजय बबन कोबरणे यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमन पदी लिलाबाई सूर्यभान कोबरणे यांच्या नावाची सूचना संचालक रोहिदास कुंडलीक कोबरणे यांनी दिली तर रखमाजी एकनाथ हारदे यांनी अनुमोदन दिले. निवडणूक अधिकारी म्हणून आगळे साहेब व लोखंडे साहेब हे उपस्थित होते यावेळी त्यांना सचिव राऊत भाऊसाहेब यांनी सहकार्य केले. 

यावेळी संचालक सौ कमलबाई बबन कोबरणे, रखमाजी एकनाथ कोबरणे ,रोहिदास कुंडलीक कोबरणे, भाऊसाहेब भाऊ कोबरणे, विजय बबन कोबरणे, शशिकांत सिताराम कोबरणे, कैलास नारायण कोबरणे, विलास लाहुंडे, सौ सुनिता शिवाजी कोळसे आदी संचालक उपस्थित होते. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच संस्थेच्या वतीने निवडणूक अधिकारी यांचाही सत्कार करण्यात आला. निवड यावेळी बापूसाहेब आंबादास कोबरणे, सरपंच अमोल भानगडे, माजी चेअरमन मंजाबापू कोबरणे ,त्रिंबक कोबरणे ,किशोर कोबरणे, उपसरपंच विकास  कोबरणे, पोपटराव कोबरणे, रवींद्र कोबरणे आदी उपस्थित होते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी खासदार प्रसाद तनपुरे साहेब ,मार्केट कमिटीचे सभापती अरुण साहेब तनपुरे ,डॉ. सौ उषाताई तनपुरे ,राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे, साई संस्थान विश्वस्त सुरेश वाबळे यांनी अभिनंदन केले आहे.
close