कामगार ..
बालकामगारव्यथा
फार जुना आक्रोश
थांबवा अनिष्टप्रथा
सरकारी कंठशोष
केले कडक कायदे
करा भला जयघोष
अंमल बजावणीचा
नकोओढवाया रोष
फायदामलिदा हवा
व्यापारी हो मदहोश
स्वस्तात मिळे लेबर
भरावे आपले कोष
आकडेवारी देण्यात
का विरोधकां संतोष
बालकामगार वाढले
पहावा कुणाचा दोष
- हेमंत मुसरीफ पुणे.
९७३०३०६९९६
www.kavyakusum.com
बासष्ठी ..
महाराष्ट्राची बासष्ठी
काय वर्णूं तया थाट
शिवबाचे स्वप्न सत्य
सह्याद्री कणा ताठ
स्नेहाचा शीतल माठ
संस्कृतीचे भिन्न घाट
अवघ्या भारत भू ला
प्रगतीची दावी वाट
संधी इथे काठोकाठ
येता होई भरभराट
सामाऊनि घेई सर्वां
माझा तुझा नसे नाट
बावनकशी गा सोने
न पितळीझगझगाट
अंगा येता घेऊ शिंगा
आगळा आहे झिंगाट
बलवान तरी संयमी
अंगात शक्ती विराट
जगा अन् जगू द्यावे
नको फुका गुरगुराट
सुजाणां पाऊल वाट
बदलून जाय ललाट
म्हणूनचं महाराष्ट्राचे
टिकाकार होती भाट
-- हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996.
www.kavyakusum.com
3
महा रूप ..
महाराष्ट्राची आकृती
पाण्या सम रंग रूप
सामावून घेई परक्या
करी सर्वां एकरूप
अभ्यासावे असे धडे
सुलेख प्रगती प्रारूप
तिजोरी भरू देशाची
देतो मुक्त हस्ते खूप
भारावेअख्ख्या जगा
संस्कृती ही सुस्वरूप
अमोल ठेव इतिहास
वर्तन तसेचं अनुरूप
आपले म्हणून यायचे
रहावे येथे सुखरूप
शिवरायांचे स्वराज्य
रंध्रा रंध्रात येई हुरुप
महाराष्ट्राच्या या दारी
कुणी न जाई विन्मुख
परत जातां आठवणी
मनी सदैव रूख रूख
बिघडू नका घडी मात्र
वागू नका कधी विद्रूप
रामदासी लाठी हाती
दाऊ शंकरी रूद्र रूप
-- हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996.
www.kavyakusum.com
4)
महाराष्ट्री ..
महाराष्ट्री मन मोठे
सामावून घेई सर्वां
आपला होवून जाई
आलेला काल परवा
बेरोजगारां रोजगार
कशास करता पर्वा
पांथस्ता देई सावली
असा वटवृक्ष गारवा
इथली असे संस्कृती
आधीदुस-या भरवा
नडेल नाठाळ कुणी
भलीचांगली जिरवा
वेगळी तुमची भाषा
जपतो सन्मान गर्वा
मराठीमाणूस भावा
जसा सुगंधी मरवा
लावतो जीवपरक्या
स्नेहात त्याचे हरवा
तुमच्या सणात नाचे
त्याचे सणात मिरवा
इथला बनूनि रहावे
तुम्हीचं आता ठरवा
विसरता भेद भावा
आनंद मिळेल सर्वां
- हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996
www.kavyakusum.com

