shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मध्यस्थी प्रक्रियेचा जागृकता कार्यक्रम संपन्न ; मध्यस्थी प्रक्रियेत मध्यस्थाची भूमिका महत्वाची - यार्लगड्डा

प्रतिनिधी :आसावरी वायकर

नगर : ३ /  मध्यस्थी प्रक्रियेमध्ये मध्यस्थाची अत्यंत महत्वाची भूमिका असते' असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. सुधाकर यार्लगड्डा यांनी केले. ते मध्यस्थी जागृकता कार्यक्रमात बोलत होते. सा. मुख्य मध्यस्थी केंद्र, मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, अहमदनगर बार असोसिएशन, अहमदनगर व सेंट्रल बार असोसिएशन, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यस्थी प्रक्रिया बाबत जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन दि. ३०/०४/२०२२ रोजी करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुधाकर वें. यार्लगड्डा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर हे होते. त्यांनी मध्यस्थी प्रक्रियेमध्ये मध्यस्थाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. तसेच त्यांनी मध्यस्थ विधिज्ञांनी पक्षकारांना जास्तीत जास्त वेळ देवून संयम ठेवून त्यांचे ऐकूण घेणे आणि मध्यस्थी प्रक्रियेबाबत समजावून सांगणे किती महत्वाचे आहे हे सांगितले. तसेच लवाद म्हणजे खाजगी न्यायालय. ज्यामध्ये पक्षकारांच्या संमतीने न्याय निवाडा करण्याकरीता आदरणीय व्यक्ती निवडला जातो हे अतिशय सोप्या भाषेमध्ये सर्वांना समजेल अशा स्वरुपात सांगितले तसेच लोकन्यायालय, मध्यस्थी प्रक्रिया आणि लवाद प्रक्रियेतील फरक काय असतो ते सांगितले.

या कार्यक्रमाची प्रस्तावना रेवती रा. देशपांडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर यांनी केले. त्यामध्ये त्यांनी मध्यस्थी प्रक्रिया पुर्वीच्या काळापासून चालत आलेली असून अंगद आणि श्रीकृष्ण यांचे उदाहरण देवून मध्यस्थी प्रक्रिया काय आहे ? या बाबतची माहिती दिली. त्यानंतर सदर कार्यक्रमातील वक्ते योगिता खेडकर, 'सुकून' आणि 'चला बोलूया' यामधील समुपदेशक यांनी अतिशय सुंदर रीत्या भावनिक आधार व मानसिक आरोग्य आधार यांचे महत्व मध्यस्थी प्रक्रियेमध्ये किती महत्वाचे आहे तसेच येणा-या प्रत्येक पक्षकाराला सर्व प्रथम भावनिक आधार व मानसिक आरोग्य आधार 'सुकून' आणि 'चला बोलूया' या समुपदेशन केंद्रांत दिला जातो. त्यानंतर त्यांचे समुपदेशन केले जाते असे सांगितले. कार्यक्रमाचे वक्ते अॅड. किशोर एम. देशपांडे, अध्यक्ष, सेंट्रल बार असोसिएशन यांनी मध्यस्थी प्रक्रियेमध्ये 'श्रीकृष्ण'चे उदाहरण देवून विधिज्ञांची भूमिका मध्यस्थी प्रक्रियेत किती महत्वाची आहे या बाबत माहिती सांगितली. विधिज्ञांना सर्व प्रथम समजते की, सदरील प्रकरण मध्यस्थीमध्ये मिटवता येईल की नाही त्यामुळे कोर्टात न जाता मध्यस्थी मार्फत न्याय मिळू शकतो याची जाणीव वकिलांनी पक्षकारांना देणे आवश्यक आहे. त्यानंतर अॅड. अनिल सरोदे, अध्यक्ष, अहमदनगर बार असोसिएशन, अहमदनगर यांनी मध्यस्थी मार्फत खटले मिटवले तर ते अनंत काळ टिकणारे असेल तसेच आपल्या पक्षकारांना मध्यस्थीचे महत्त्व काय आहे सांगून जास्तीत जास्त खटले मध्यस्थीमार्फत कसे मिटविता येईल हे सांगावे याबाबत माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. संदिप वांढेकर यांनी केले व आभार प्रदर्शन अॅड. अभिषेक भगत यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे सुरवात नालसा गीताने करण्यात आली व सांगता राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली. सदर कार्यक्रमांत मध्यस्थ विधिज्ञ, पॅनल विधिज्ञ, इन्शुरन्स कंपनी, बँका यांचे अधिकारी व पक्षकार उपस्थित होते.
close