चंद्रपूर-किरण घाटे- उस्मानाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मिशन वात्सल्य समितीचे सदस्य गणेश रानबा वाघमारे यांची कन्या परी हिचा वाढदिवस आज रविवार दि.२९ मे ला आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात आला. स्त्री जन्माचे स्वागत,बेटी बचाव बेटी पढाव, स्त्री भ्रूणहत्या रोखु या ,मुलीचे संगोपन करुया..
या संदेशाला डोळ्यां समोर ठेवून येथील शासकीय स्त्री रुग्णालयात परीचा वाढदिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो.मुली विषयी जनजागृती करणे हा एक मुळ उद्देश छोट्या परीचा वाढदिवस मागिल असतो.या ही वर्षी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अनोखी परीच्या वाढदिवसा निमित्त स्त्री जातीचे जन्मलेल्या बाळाला कपडे व जन्म दिलेल्या बाळाच्या मातेला साडी देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.या वेळी आलेल्या मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित झालेल्या मान्यवरांनी अनोखी परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मुली विषयी भावना व्यक्त केल्या .आजही समाजात मुलगी जन्माला आली म्हटले की,संबंधित काही नातलग नकारात्मक दृष्टीने बघतात! समाजातील मुलगी आज मुलाच्या बरोबरीने उभी राहिली आहे.
मुलींनी सर्वच क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने झेप घेतली आहे,आपण महिलांचा सन्मान केला पाहिजे.तिच्या कला गुणांना समोर आणले पाहिजे.अश्या भावनिक प्रतिक्रिया काही मान्यवरांनी आपल्या बोलण्यातून या वेळी व्यक्त केल्या . मुलीला जन्म दिलेल्या बाळाच्या मातेचे व नातलगांचे अभिनंदन केले.अनोखी परी हिचा आजचा नववा वाढदिवस होता.पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत जमलेल्या मातांना मुलीचे योग्य प्रकारे संगोपन करावे असे आवाहन केले.आकाशवाणीचे उन्मेष वाळिंम्बे ,अब्दुल लतिफ, नलिनी दलभंजन,रिबेका भंडारे यांनी अनोखी परीच्या नावा प्रमाणेच हा कार्यक्रम अनोख्या पध्दतीने घेऊन समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे असे मत व्यक्त केले .
या वेळी प्रामुख्याने आकाशवाणी केंद्र संचालक उन्मेष वाळिम्बे,रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अब्दुल लतिफ,दै.यशवंतचे पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे,वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता गवळी,डॉ.चंद्रकांत लामतुरे,किसन घरबुडवे, मच्छिंद्र चव्हाण,सचिन चौधरी,संजय गजधने,विष्णु घरबुडवे,दिपक पांढरे,नामदेव वाघमारे,विशाल घरबुडवे, अमर हुंबे,अभिजीत शेरकर,संबोधी गायकवाड,आयुष वाघमारे,अनुष वाघमारे,स्त्री रोग तज्ञ डॉ.शैलजा मिटकरी,सरस्वती थोरात, नलिनी दलभंजन,रिबेका भंडारे,रशिद अब्दुल रहिम काझी, माधुरी जाधव, प्रभावती माने, सुतार,बनसोडे,अन्य इतर मान्यवर व रुग्णालयातील कर्मचारी आणि उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण त्यांचे नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन रिबेका भंडारे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी मानले.या कार्यक्रमात एकुण विस स्त्री जातीच्या जन्मलेल्या बाळाला नविन कपडे व त्यांच्या मातांना साडीचे वितरण करण्यात आले.अनेकांनी या कार्यक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले.

