श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - आजी,माजी सैनिकांच्या न्याय हक्कांसाठी संघर्षशिल असलेल्या त्रिदल सैनिक संघटनेची बैठक नुकताच येथील शिव पार्वती मंगल कार्यालयात संपन्न झाली, यामध्ये नव्याने कार्यकारिणीची निवड देखील करण्यात आली. यात संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी संग्राम जीत यादव,उपाध्यक्ष महेश ढोकचौळे, सेक्रेटरी सुनील भालेराव, सहसेक्रेटरी संतोष देवराय, खजिनदार भगीरथ पवार यांना त्रिदल सैनिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शरद चव्हाण यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देण्यात आले.
याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मेजर चव्हाण व मेजर कृष्णा सरदार यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संघटन मजबुतीकरणासाठी मेजर कृष्णा सरदार यांनी माजी सैनिकांना संबोधित करताना म्हणाले की,ज्याप्रमाणे आजी, माजी सैनिकांसाठी त्रिदल सैनिक सेवा संघ कार्य करते,त्याचप्रमाणे सैनिकांच्या पाल्यांना देखील शैक्षणिक प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी येतात उदा. ऍडमिशन मध्ये आरक्षण असूनही ॲडमिशन मिळत नाही, फी बाबत तगादा लावणे,टीसी न देणे, टारगट आणि रोडरोमिओ मुलांकडून मुला-मुलींना त्रास होणे,या सर्व गोष्टींना आळा घालण्याचे काम त्रिदल सैनिक विद्यार्थी परिषद भविष्यात करणार आहे,ज्यामुळे शासन आणि प्रशासन यांना देखील या त्रिदल सैनिक विद्यार्थी परिषदेची मोठ्या प्रमाणात साथ लाभणार आहे,
या कार्यक्रमास माजी सैनिक सुनील गवळी,राजेंद्र तोरणे,रवींद्र कुलकर्णी, बाळासाहेब बनकर, प्रदीप विटकरे, वसंतराव देसाई, महिला अध्यक्षा छायाताई मोटे राम म्हैस ,अजय तोरणे,शिवप्रहार चे जिल्हा सचिव बाबासाहेब भांड, विलास खर्डे,अमित देशमुख ,महेश ढोकचौळे , संग्राम अजित, यादव सुनील भालेराव, संतोष देवराय इत्यादी आजी, माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

