shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माळवाडगावांत छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन..!!

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - तालुक्यातील माळवडगांव येथील जगदंबा युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती माळवाडगांव येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे साजरी केली.यावेळी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रथम छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर महाराजांची आरती करण्यात आली. 


छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आत्मसाथ करावेत, शंभुराजेंचे अनेक भाषांवर असलेले प्रभुत्व, राजकीय रणनिती, निरव्यसनीपणा, माता-पिता सन्मान, स्वराज्याविषयीची आत्मीयता, घेतलेली जबाबदारी पार पाडण्याची सवय अशा सर्व गोष्टी आंगिकारणे सध्याच्या आयुष्यात गरजेचे असल्याचे मत तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष नानासाहेब आसने यांनी सांगितले.तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास तरुण पिढीला माहित होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब काळे यांनी केले.


धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माळवाडगाव येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात अभिवादन करण्यात आले याप्रसंगी दिलीपराव हुरुळे, सुधीर आसने, अशोक कामगार पतपेढीचे संचालक भाऊसाहेब आसने,फेडमन सुरेश मदने, जालिंदर कर्पे, दिलीप आसने, पद्माकर आसने, पत्रकार संदीप आसने, अतिश आसने, सतीश आसने, विठ्ठल आसने, सोहेल पठाण,सत्यम आसने,तेजस आसने यासह आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांचे पत्रकार संदीप आसने यांनी आभार मानले.
close