shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठातील उपक्रमशील विज्ञान शिक्षक अरुण तुपविहीरे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                                  बुधवार दिनांक १८ मे २०२

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठातील उपक्रमशील विज्ञान शिक्षक अरुण तुपविहीरे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार..!!

कृषी विद्यापीठ : सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठातील उपक्रमशील विज्ञान शिक्षक अरुण तुपविहीरे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल मार्फत राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम अंकुशराव लांडगे नाट्यगृह पुणे येथे नुकताच संपन्न झाला. शिक्षक आमदार विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे, सिने अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते सेवा सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सभापती डॉ.प्रमोद रसाळ, सचिव डॉ. महानंद माने, खजिनदार महेश घाडगे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा धनवटे उपमुख्याध्यापक प्रा.नंदकुमार मुळे, पर्यवेक्षक संदेश विसपुते, प्रा. जितेंद्र मेटकर, शमशुद्दीन इनामदार, सुरेखा आढाव, बाळासाहेब डोंगरे, दशरथ दळवी व सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले. अरुण तुपविहीरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयात आवड निर्माण होण्याकरिता विविध उपक्रम शाळेत राबवले आहेत.

हसत खेळत विज्ञान प्रयोग, अपूर्व विज्ञान मेळावा, विज्ञान कार्यशाळेचे आयोजन, अंधश्रद्धा निर्मूलन करीता सप्रयोग व्याख्यान, नामवंत संस्थांना भेट, शास्त्रज्ञांचे व्याख्यान व मार्गदर्शन, आकाश निरीक्षण कार्यक्रम, विद्यार्थ्यांची इस्रो केंद्रास भेट. विशेष दिनानिमित्त प्रश्नमंजुषा, क्किजचे आयोजन, तसेच विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर स्कॉलरशिप अशा विविध स्पर्धा परीक्षा करीता मार्गदर्शन केले आहे. विज्ञान प्रदर्शन, इंस्पायर अवार्ड करिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शनव सहभाग, अनेक प्रशिक्षणामध्ये त्यांनी विविध स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close