shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे महाराष्ट्र व गोवा राज्यातील पहिली बैठक इंदापूर येथे संपन्न

इंदापूर येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे महाराष्ट्र  व गोवा राज्यातील पहिली बैठक इंदापूर येथे संपन्न 
 इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर शहरात युवकांकडून चांगले काम केले जात आहे. त्यांच्या कामाची दखल राज्याच्या नेहरू युवा केंद्राने घेतले आहे.  इंदापूर तालुक्यातील युवकांच्या सामाजिक कामाला गती प्राप्त होण्यासाठी, युवकांना पाहिजे तेवढे सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. अशी ग्वाही महाराष्ट्र व गोवा राज्याचे नेहरू युवा केंद्राचे संचालक प्रकाशकुमार मनोरे यांनी दिली. 
इंदापूर येथे नेहरू युवा केंद्र मुंबई, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय यांच्या वतीने शहा सांस्कृतिक भवन मध्ये शुक्रवार ( दि. १३ ) रोजी नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व शहा हेल्थ क्लब यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोरे बोलत होते. यावेळी नेहरू युवा केंद्राचे प्रमुख यशवंत मानखेडकर, नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, कर्मयोगीचे उपाध्यक्ष भरत शहा, शहा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुख वैशाली शहा, कराटे प्रशिक्षक दत्तात्रय व्यवहारे, राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक व योग शिक्षक शरद झोळ,   नेहरू युवा केंद्राचे मार्गदर्शक डॉ. संदेश शहा, तालुका प्रतिनिधी विकास कणसे, संदीप बारवकर, तानाजी मारकड व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलताना यशवंत मानखेडकर म्हणाले की, जीवनाचा सर्वात महत्वाचा अविभाज्य भाग असलेल्या योगाचे प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. इंदापूरच्या शहा परिवाराने मागील तीन पिढ्यांना पासून, सामाजिक सेवेत मोठे योगदान देत आहेत. त्याच बरोबर डॉ. संदेश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात नेहरू युवा केंद्राचे काम उत्कृष्टपणे चालू आहे. युवकांना चांगली उभारी देण्यासाठी युवक नेते अंगद शहा यांनी चांगले काम केले आहे. असे गौरवउद्धार मानखेडकर यांनी काढले. 

यावेळी उपस्थित सर्वांनी योगाचे धडे देण्यात आले. तसेच सामूहिक ताडासन योग प्रकार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र व गोवा या राज्यातील नेहरू युवा केंद्राच्या योगा दिनाच्या तयारीची पहिली बैठक इंदापूर येथे झाली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक नेते अंगद शहा यांनी केले तर आभार शहा हेल्थ क्लबचे प्रमुख प्रशिक्षक दत्तात्रय व्यवहारे यांनी मानले. 

फोटो ओळ : इंदापूर येथे नेहरू युवा केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या आढावा बैठकीत ताडासन योग प्रकार करताना प्रकाशकुमार मनोरे, यशवंत मानखेडकर, शहा परिवार व मान्यवर ( छायाचित्र : सागर शिंदे, इंदापूर )
close