चंद्रपूर◼️किरण घाटे जि.प्र.◼️
महाराष्ट्र परिचारिका संघटना लातूरच्या पुढाकाराने सुरु असलेल्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असुन चंद्रपूर परिचारिका संघटना या आंदोलनात सहभागी झाली आहे. दरम्यान चंद्रपूर आपने या आंदोलनाला आज सोमवारला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मुंबई येथे दि. 23 मे ते 25 मे रोजी धरणे आंदोलन करण्यात आली. 1 तास काम बंद ठेवून शासनाचा निषेध करण्यात आला.दि. 26 मे रोजी राज्यव्यापी काम बंद आंदोलन व 28 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु झालेले आहे .
1) शासकीय पदभरती करने 2) केंद्र शासनाप्रमाने नर्सिंग भत्ता नव्याने मंजूर करण्यात यावे. 3) गणवेश भत्ता 4) पदनाम बदल 5) शैक्षणिक़ भत्ते 6) रजा 7) बदली आदीं परिचारिका संघटनेच्या मागण्या आहे. याच मागण्यांच्या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय चंद्रपूर येथे आंदोलन सुरु झालेले आहे.
आम आदमी पार्टी चन्द्रपुर सोशल मीडिया हेड व परिचारक राजेश चेडगुलवार यांनी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार कड़े शासकीय नौकर भरती करणे खाजगीकरण बंद करने,व ठेकदारी पद्धती बंद करने या शिवाय शासकिय भरती करण्यात यावी . या मागण्या संघटनेच्या माध्यमातून सादर केल्या आहे . महाराष्ट्र परिचरिका संघटना यांच्या अश्या मागण्यांची त्वरित पूर्तता करण्यात यावी.या साठी हे आंदोलन सुरु आहे.
राजेश चेडगुलवार यांचा नेतृत्वा मध्ये जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये आज समर्थन पत्र देण्यात आले .पुढील रुपरेषा तयार करून व एकत्रित येऊन संघर्ष करण्यास आप तत्पर झाले आहे. या वेळी महिला अध्यक्ष ऍड .सुनीता पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, युवा अध्यक्ष मयूर राईकवार, सुनील रत्नाकर भोयर संघटन मंत्री महानगर, सिकंदर सागोरे उपाध्यक्ष , महानगर सचिव राजू कुडे, युवा अध्यक्ष संतोष बोपचे, अल्पसंख्यक अध्यक्ष अशरफ सय्यद अली, सुनिल सदभैया माजी सैनिक, सुजाता बोडेले संघटन मंत्री, मनीषा पडगेलवार , वन्दना कुंदावार महिला शहर सचिव, शबनम शेख कार्यकारी अध्यक्ष, महेश सिंग , सागर बोबडे, महेंद्र प्रधान देवेंद्र प्रधान आदीं उपस्थित होते.

