shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रयत शिक्षण संस्थेतील गुरुजन माझे प्रेरणास्थान - साहित्यिक पुंडलिक गवंडी


श्रीरामपूर (शौकतभाई शेख): - रयत शिक्षण संस्थेत सन १९६५-६६ या काळात माझे शिक्षण झाले, श्रीरामपूरच्या स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्र महाविद्यालयात प्राचार्य शंकरराव अनारसे, प्राचार्य आ. पां. खरात आदी प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक यांनी माझ्यावर अनंत उपकार केले. बोरावके कॉलेज, कॉमर्स कॉलेज आणि इतर शाखेतील सेवक हे कर्मवीर विचारांनी भारावलेले असल्यामुळे आमच्यासारख्या खेड्यातील विद्यार्थ्यांना खूप मदत केली,आधार दिला, रयत शिक्षण संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर असे गुरुजन हेच माझ्या जीवनाचे प्रेरणास्थान असल्याचे मत अकोले येथील ज्येष्ठ ष्ठ साहित्यिक पुंडलिक गवंडी यांनी व्यक्त केले. 

        येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे साहित्यिक आणि माजी मुख्याध्यापक पुंडलिक गवंडी यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल प्राचार्य शंकरराव अनारसे, प्राचार्य टी. ई. शेळके, डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सत्कार केला त्याप्रसंगी लेखक गवंडी बोलत होते.प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पुंडलिक गवंडी यांच्या साहित्य, शिक्षण, सामाजिक कार्याचा परिचय करून दिला. पुंडलिक चिमणराव गवंडी यांचे 'हातोडा 'हे आत्मकथन मराठी साहित्यविश्वात लोकप्रिय ठरले. बेलदार समाजातील भटकंती सोसत २३ फेब्रुवारी १९४५ रोजी जन्म झालेले पुंडलिक गवंडी यांनी प्रतिकूल स्थितीत एम. ए. मराठी बी. एड.केले. शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थासंचालक अशा पदावर कार्य केले. १९६७ते २००३ पर्यंत नोकरी केली. कविता, कादंबरी, वैचारिक, चिंतनपर, चरित्र, आत्मचरित्र, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राष्ट्रीय स्वरूपाची अनेक ग्रन्थ लिहिले त्यांना अनेक पुरस्कार लाभले, अनेक सामाजिक कार्यात ते सहभागी आहेत, त्यामुळे त्यांचा  तपस्वी जीवनाचा हा सन्मान अनेकांना प्रेरणादायी आहे असे डॉ. उपाध्ये यांनी सांगितले, साहित्यिक गवंडी यांनी आपल्या साहित्य कार्याचा आढावा घेतला, श्रीरामपूरच्या आठवणी सांगितल्या.प्राचार्य अनारसे यांनी आपला एक आदर्श विद्यार्थी आणि सुसंकृत साहित्यिक म्हणून गवंडी यांचा सत्कार करून मनोगत व्यक्त केले. 

        प्राचार्य शेळके यांनी हा गुरुशिष्य ऋणानुभाव सदैव टवटवीत राहिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून गवंडी यांचा सन्मान केला.सौ.कमलताई अनारसे यांनी शुभेच्छा दिल्या.गणेश गवंडी यांनी आभार मानले.
close