shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनलचेचे सर्व उमेदवार निवडून येतील - हनुमंत जगताप.

श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनलचेचे सर्व उमेदवार निवडून येतील - हनुमंत जगताप.

श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनल च्या वतीने श्रीनाथ मंदिरात नारळ फोडून केला प्रचाराला प्रारंभ .

श्री नाथ वडापुरी विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीत होणार चुरस.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी असणारी श्री नाथ वडापुरी विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित वडापुरी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक२०२२-२३ ते२०२६-२७ साठी  श्री नाथ परिवर्तन विकास पॅनल च्या वतीने दि११मे २०२२ रोजी श्रीनाथ मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
यावेळी श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनलचे सर्व उमेदवार, प्रकाशक, प्रचारप्रमुख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
 रविवार दि. २२ मे २०२२ रोजी सकाळी ८ ते ४  वाजेपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी या ठिकाणी श्री नाथ वडापुरी विकास कार्यकारी सेवा सोसायटी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक साठी मतदान होणार असून श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनलने प्रचाराचा नारळ फोडून सर्वच उमेदवार निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला .
श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनलचे चिन्ह  कप बशी असून या चिन्हावर शिक्का मारून पॅनलचे सर्व उमेदवार निवडून द्यावे असे आवाहन यावेळी हनुमंत जगताप यांनी पॅनल मधील सर्वांना केले.तर सर्वच उमेदवार निवडून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनलचे उमेदवार खालील प्रमाणे:

सर्वसाधारण मतदार संघ: धीरज शिवाजी काटकर, हनुमंत बापूराव जगताप ,निर्मला बाळासाहेब देवकर, ज्ञानेश्वर बाळासो देवकर, तुकाराम शंकरराव निंबाळकर, राजेंद्र नारायण फडतरे, प्रताप केरबा बागल ,अजमुद्दिन तय्यब शेख.

महिला राखीव मतदारसंघ:
मालन दत्तू कोकरे, दिपालीबाई आबा सुर्वे.

इतर मागास वर्ग मतदारसंघ:
सोपान भगवान शिंदे.

भटक्या जाती विमुक्त जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ:
सुनील महादेव पिंगळे.

अनुसूचित जाती जमाती मतदार संघ:
संपत गोपाळ चंदनशिवे.
close