बोरी येथील ज्ञानदेव शिंदे यांनी अभिष्टचिंतन दिनानिमित्त आश्रम शाळेतील मुलांना केले अन्नधान्य व खाऊ वाटप.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील बोरी गावचे सुपुत्र ज्ञानदेव उत्तम शिंदे हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे तसेच राजकीय क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष असून त्यांचा अभिष्टचिंतन दिनांक २७ एप्रिल रोजी होता. तसेच लग्न वाढदिवस ७ मे रोजी होता याचे औचित्य साधून त्यांनी सामाजिक उपक्रमातून म्हणजेच बोरी येथील हरिभाऊ पाटील प्रतिष्ठान चे आश्रम शाळेतील मुलांना अन्नधान्य व खाऊ वाटप करून अनोख्या रितीने वाढदिवस साजरा केला.
यावेळी गणेश शिंदे विनायक शिंदे धीरज शिंदे व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इत्यादी उपस्थित होते.
त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत असल्याचे दिसून येत आहे.

