shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर शिवसेनेच्या वतीने नागरिकांनी धर्मवीर सिनेमा मोफत२०० नागरिकांनी घेतला लाभ : इंदापूर शहरातून मोटारसायकल रॅली

इंदापूर शिवसेनेच्या वतीने नागरिकांनी धर्मवीर सिनेमा मोफत

२०० नागरिकांनी घेतला लाभ : इंदापूर शहरातून मोटारसायकल रॅली 
  इंदापूर प्रतिनिधी :शिवसेनेचे जेष्ठ नेते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित जीवनपट 'धर्मवीर' मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्यांचा जीवनप्रवास सर्वांपर्यंत पोहचावा म्हणून इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने शहरातील २०० नागरिकांना मोफत चित्रपट दाखविण्यात आला. यावेळी चित्रपटाला हाऊसफुल्ल गर्दी झाली होती. शहरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहत चित्रपटाचा आनंद घेतला. 

इंदापूर शहरातील केशर चित्र मंदिर येथे गुरुवार ( दि. १९ ) रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सिनेमा दाखविण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक विशाल बोन्द्रे, भिमराव भोसले, तालुका अध्यक्ष नितीन शिंदे, इंदापूर शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी, क्षेत्रप्रमुख सचिन चौगुले, शहर समन्वयक संजय खंडागळे, अरुण पवार, अवधूत पाटील, अशोक देवकर, संतोष क्षीरसागर, बालाजी पाटील, सचिन इंगळे, अविनाश खंडागळे.  सुरज काळे तालुका क्षेत्र प्रमुख .आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी ५ वाजता शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी इंदापूर शहरातून मोटारसायकल रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवसेनेचा विजय असो अशा घोषणा दिल्या. तसेच सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, धर्मवीर आनंद दिघे अमर रहे, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सिनेमागृहाचा परिसर दुमदुमला. सदर कार्यक्रमाचे नियोजन क्षेत्रप्रमुख सचिन चौगुले, शहर समन्वयक संजय खंडागळे यांनी केले होते. 

यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हा समन्वयक विशाल बोन्द्रे म्हणाले की, शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे गुरू शिष्याचे नाते संपूर्ण राज्यात माहिती आहे. मात्र चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचा जीवनपट मांडला असून, राज्यातील शिवसैनिकांनी या चित्रपटातुन आदर्श घ्यावा. असेही बोन्द्रे म्हणाले. 



close