shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंचरंग प्रबोधिनी परिवारा मार्फत डॉ .पाटील व डॉ .कोठाडिया यांचा सत्कार संपन्न ...


 प्रतिनिधी : आसावरी वायकर

सोलापूर : २० /  पंचरंग प्रबोधिनी परिवारातर्फे दि . २० मे रोजी डॉ . विजय  पाटील यांचा वैद्यकीय सेवा पुरस्कार  मिळाल्याबद्दल तसेच डॉ .सरिता कोठाडीया यांचा पीएचडी मिळाल्याबद्दल    सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी  मराठी साहित्य संमेलनाच्या  माजी अध्यक्षा सुरेखा  शहा, उद्योगपती   संजीव जयकुमार पाटील,   नयना कोठडीया ,संपादक  डॉ . रावसाहेब पाटील, माणिक  पाटील, मनीष  शहा, नंदकुमार  कंगळे  आदी  मान्यवर उपस्थित होते. या सभेत २५ व्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलन पूर्व तयारी संबंधीची चर्चा झाली. 

 व्यापक  पत्रकार परिषदेत  तारखा,स्थळ, पदाधिकारी यांची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे नियोजित अध्यक्ष डॉ . रावसाहेब पाटील सोलापूर यांनी सांगितले.संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

संमेलनास उपस्थित राहणार्‍या रसिकांनी  आपल्या नावाची  नोंदणी करण्याचेही आवाहन  यावेळी  करण्यात आले .
close