राहाता (समीर बेग) - आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समिती आयोजित शिवशंभु ऐतिहासिक लेखीपरीक्षा-2021 बक्षीस वितरण समारंभ 1 मे रोजी येथील वीरभद्र महाराज मंदिरामध्ये संपन्न झाला.
राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रत्येक घरो-घरी पोहचवण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजापुढे यावा या उद्देश्याने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दरवर्षी समितीकडुन छत्रपती शिवाजी महाराजांवर जिल्हाभर लेखी परीक्षांचे आयोजन करण्यात येते, यात १० वर्ष ते ६० वर्ष वयोगटातील मुले,मुली,महिला -पुरुष,वृद्ध स्पर्धक सहभागी होऊन आपली परीक्षा देत असतात,या परीक्षेत जे स्पर्धक पहिला क्रमांकाने उत्तीर्ण होतात,त्यांना समितीकडुन प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह दिले जाते, त्याप्रमाणे वर्षीही समितीकडुन लेखीपरीक्षांचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये अहमदनगर जिल्हातुन प्रथम आलेल्या स्पर्धकांना राहाता येथील वीरभद्र मंदिराच्या प्रांगणातील बक्षिस वितरण समारंभात प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह वितरण करुन सन्मानित करण्यात आले.
यावेळी समितीचे जिल्हाप्रमुख कांतीलाल मडके,जिल्हा संपर्क प्रमुख अशोक काळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संध्याताई गिधाड, जामखेड तालुका प्रमुख सुशांत खोसे,श्रीगोंदा तालुका प्रमुख प्रतिक्षा कानगुडे,आर.जे.एस.चे बाळासाहेब गिधाड, ओ.बी.सी. समितीचे शौकत तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते दिपक सोळंकी,विरभद्र मंदिराचे पुजारी सर्जेराव भगत,गोटु बोरकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

