सीसीटीव्ही फुटेज आधारे शोधला आरोपी..!!
------------------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
केज येथून एका ६६ वर्ष वयाच्या वृद्धाला थंड पेय आणि केळीतून गुंगी येणारे औषध खायला व प्यायला देऊन त्याच्या हाताच्या बोटातील ६० हजाराच्या रु. किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या अज्ञात इसमाने लांबविल्या होत्या त्या प्रकरणातील आरोपी तपासी अधिकारी राम यादव यांनी नेकनूरच्या बाजारातून ताब्यात घेतला.
या घटनेची माहितदिi अशी की. ५ एप्रिल मंगळवार रोजी केज तालुक्यातील धर्मराज थोरात हे कानडी रोड लगतच्या विजय भन्साळी यांच्या विजय कृषी सेवा केंद्राच्या समोर थांबले असता सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० चा. च्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने धर्मराज थोरात यांना त्या अनोळखी व्यक्तीच्या मुलीची सोयरीक जुळवायची आहे. अशी बतावणी केली. पाहुणे येई पर्यंत चहापाणी पिण्याचा बहाना केला. थोरात याना तो अनोळखी व्यक्तीने स्प्राईट या थंड पेयाच्या बाटलीत गुंगी येणारे औषध मिसळून ते प्यायला दिले. तसेच त्यांनी केळी मध्ये पण गुंगी येणारे औषध खायला दिले. नंतर ते दोघे कानडी रोड वरुन क्रांती नगर जवळच्या केजडी नदी मधुन पाटलाचे शेतात गेले. तेथे गेल्या नंतर धर्मराज थोरात यांना गुंगी येताच त्याचा गैरफायदा घेऊन त्या अनोळखी ठगाने धर्मराज थोरात यांच्या उजव्या हाताच्या बोटातील प्रत्येकी दहा ग्रॅम वजनाच्या जुन्या दोन अंगठ्या काढून घेऊन पोबारा केला.
धर्मराज थोरात यांना त्यांच्या हातातील दोन अंगठ्या त्या ठगाने फसवणूक करून लुटल्याचे माहीत होताच दि. ८ एप्रिल रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार गु. र. न. १११/२०२२ भा. दं. वि. ३२८ व ३७९ नुसार अज्ञान व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे पुढील तपास तपासी अधिकारी राम यादव हे करीत होते.
दरम्यान तपासी अधिकारी राम यादव यांनी एका स्वीट होम मधील सीसीटीव्हीचे गुन्हेगार व धर्मराज थोरात यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळविले आणि त्या आधारे बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील तपास यंत्रणेला सतर्क केले होते.
दि. १ मे रोजी एका गुप्त खबऱ्याने नेकनर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास जाधव यांना एका संशयित इस्माची माहिती दिली त्या नंतर पोलीस उपनिरीक्षक यांनीं ताब्यात घेवून त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या जवळ एका पिशवीत शीतपेयाची अर्धी बाटली आढळून आली. सिसिटीव्ही फुटेज व तो संशयीत यात साधर्म्य असल्याचे जाणवले निष्पन्न होताच त्याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली. तो भामटा हा लातूर जिल्ह्यातील वांगजी ता. ऑसा येथील राजेंद्र बिरू लांडगे हा आहे. अत्यंत शिस्तबध्द आणि कसोशीने तपास करून पोलीस नाईक राम यादव यांनी नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यांच्या मदतीने थंड पेयात गुंगी येणारे द्रव टाकून ते पिण्यास देवून लुटणारा भामटा राजेंद्र बिरुदेव लांडगे याला ताब्यात घेतले. त्या भामट्याला पोलीस केज न्यायालयात हजर करणार असून त्याच्या कडून अशा प्रकारच्या गुन्ह्याची माहिती घेत आहेत.
--------------------------------------------------


