shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शनिशिंगणापूर गावठाणला स्वतंत्र वीज पुरवठा होणार..!!राज्याचे उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री संजय बनसोडे यांची ग्वाही..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. मंगळवार दिनांक १७ मे २०२२

शनिशिंगणापूर गावठाणला स्वतंत्र वीज पुरवठा होणार-राज्याचे उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री संजय बनसोडे यांची ग्वाही..!!

 शनिशिंगणापूर : शनिशिंगणापूरला सध्या कृषी फिडरमधून वीज पुरवठा होत आहे. मात्र वीज पुरवठा करताना महावितरणच्या यंत्रणेवर ताण येतो. याठिकाणी शेकडो व्यावसायिक आहेत. त्याचप्रमाणे वीज पुरवठा खंडित झाल्यास व्यावसायिकांसह भाविकांना मोठा त्रास होतो. त्यासाठी शनिशिंगणापूर गावठाणला स्वतंत्र फिडरने वीज पुरवठा करण्याची मागणी पोलीस पाटील अॅड. सयाराम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री नामदार संजय बनसोडे यांच्याशी बोलताना केली.
      दरम्यान, राज्याचे जलसंधारणमंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या शिफारसपत्रानुसार शनिशिंगणापूर गावठाणला स्वतंत्र फिडरने वीज पुरवठा करण्याची ग्वाही राज्याचे उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री बनसोडे यांनी यावेळी दिली.

      राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री नामदार संजय बनसोडे आणि उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिदेवाचे मनोभावे दर्शन घेतलं.

त्यानंतर शनिशिंगणापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये नामदार बनसोडे आणि नामदार तनपुरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शनिशिंगणापूर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, पोलीस पाटील अॅड. सयाराम बानकर, शिर्डी देवस्थानचे विश्वस्त सुरेशशेठ वाबळे, सहाय्यक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे, सुभाष पवार, पाटबंधारे विभागाचे आंधळे आदी उपस्थित होते.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close