राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मनोज आनंतकर यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र.
विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्या वतीने मनोज अनंतकर यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर प्रशासकीय कार्यालयात पुरवठा विभागात गोदामपालक म्हणून कार्यरत असणारे मनोज आप्पासाहेब अनंतकर यांना विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्या वतीने गोदामाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या व उपायुक्त पुरवठा विभाग डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांच्या सहीचे असलेले प्रशस्तीपत्रक आज दिनांक ६ मे २०२२ रोजी इंदापूर येथील शहा संस्कृतिक भवन या ठिकाणच्या कार्यक्रमाप्रसंगी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे विभागातील उपायुक्त पुरवठा कार्यालय, सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय ,सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय, पुरवठा शाखा, सर्व गोदामे, सर्व परिमंडळ कार्यालय यांचे आय एस ओ ९००१-२०१५ व आय एस ओ२८०००-२००७ मानांकन करण्याचा तसेच सर्व रास्त भाव दुकान चे आय एस ओ९००१-१०१५ मानांकन करण्याचा महत्वकांशी कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये मनोज आप्पासाहेब आनंदकर गोदामपालक यांनी त्यांच्या अधिनस्त कार्यक्षेत्रामध्ये मानांकन कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे सदर चे काम अत्यंत कौतुकास्पद असून भविष्यात अशाच कार्य घडावे म्हणून प्रशस्ती पत्रकाद्वारे विभागीय आयुक्त कार्यालय पुरवठा विभाग पुणे यांच्या वतीने सौरभ राव विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे व डॉक्टर त्रिगुण कुलकर्णी उपायुक्त पुरवठा पुणे विभाग पुणे यांच्या वतीने देण्यात आलेले एक एप्रिल रोजी चे प्रशस्तीपत्रक आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, तहसीलदार श्रीकांत पाटील, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, सागर मिसाळ तसेच नायब तहसीलदार अनिल ठोंबरे व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले.

