shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिमाई आश्रमशाळेत लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन !!शंभर सेकंद भिमाई परिवार झाला स्तब्ध

भिमाई आश्रमशाळेत लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन !!

शंभर सेकंद भिमाई परिवार झाला स्तब्ध
इंदापूर प्रतिनिधी:- ( दि.६) लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त भिमाई आश्रमशाळेत सकाळी १० वा. शंभर सेकंद स्तब्धपणे उभे राहून उपस्थितांनी अनोख्या पद्धतीने लोकराजाला अभिवादन केले .
  मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात समतेचा संदेश देणारे, पुरोगामी विचारांचा जागर करणारे, आयुष्यभर आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी झटणारे, लोकहिताच्या विचारांचे कृतीशील दर्शन घडविणारे आणि अखेरच्या श्वासापर्यंत दीनदुबळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १०० वी पुण्यतिथी अर्थात स्मृती शताब्दी साजरी करण्यात आली.
यावेळी उपप्राचार्या सविता गोफणे व अधिक्षका अनिसा मुल्ला यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार, तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस व दिवंगत रत्नाकर मखरेंच्या (तात्या) प्रतीमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे,मुख्याध्यापक साहेबराव पवार,शिक्षक,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.
close