कालठण नं १ येथील ९२ लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे उद्घाटन मधुकर भरणे यांच्या हस्ते संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून पळसदेव बिजवडी गटातील मौजे कालठण नं १ येथील देविदास मांढरे ते शिवाजी धोत्रे ,हरिदास चव्हाण वस्ती व गटकुल वस्ती ते रेडके वस्ती या रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करणे व ९२ लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे उद्घाटन समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी अध्यक्ष महारुद्र पाटील, युवा नेते दीपक जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल भिसे, नाना नरुटे, अनिल पारेकर, राहुल पारेकर, भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे, उपाध्यक्ष ब्रह्मदेव सपकळ, देवीदास पाटील, शशिकांत पाटील, शशिकांत गटकुळ, सुजित पाटील, संपत जगताप, रवींद्र कदम, हनुमंत पाटील, संतोष शिरसागर, वैभव गटकुळ, राहुल भोई व इतर मान्यवर कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थिती होते.

