राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. २१-५
श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने ता. शेवगाव व उपविभागीय कृषि अधिकारी,श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.२०-०५-२०२२ रोजी नेवासा शेवगाव तालुका महाराष्ट्र शासन कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्यासाठी खरीप पिकांचे नियोजन निमित्ताने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी श्री विलास नलगे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक, तालुका कृषी अधिकारी शेवगाव अंकुश टकले, तंत्र अधिकारी शेवगाव पांडुरंग साळवे, कानिफनाथ मरकड उपस्थित होते.
शेती संदर्भातील आधुनिक तंत्रज्ञान वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती कृषी विस्तार अधिकारी यांना असणे गरजेचे आहे त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रा दहिगाव ने त त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मका आणि तूर पिकातील आधुनिक तंत्रज्ञान जसे मका पिकाचे विविध प्रकार, योग्य वाणांचा वापर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक तण नियंत्रण व पीक व्यवस्थापन याविषयी केंद्राचे प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विलास नलगे यांनी खरीप हंगामपूर्व पिकांचे नियोजन व कृषी विभागाच्या विविध योजना याविषयी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे कृषि विद्या विभागाचे शास्त्रज्ञ नारायण निबे यांनी ऊस लागवड तंत्रज्ञान, कृषि विस्तार विभागाचे शास्त्रज्ञ सचिन बडधे यांनी कापूस लागवड तंत्रज्ञान, पिक संरक्षण विभागाचे शास्त्रज्ञ माणिक लाखे यांनी हुमणी किड, मक्यावरील लष्करी अळी आणि कपाशीवरील बोंड आळी नियंत्रण, उद्यानविद्या विभागाचे शास्त्रज्ञ नंदकिशोर दहातोंडे यांनी फळबाग लागवड तंत्रज्ञान, प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रकाश हिंगे यांनी सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान, कार्यक्रम सहाय्यक प्रकाश बहिरट यांनी बाजरी उत्पादन तंत्रज्ञान तसेच कृषि विभागाचे अधिकारी बेलसरे साहेब यांनी क्रॉपसॅप योजनेबद्दल याबद्दल उपस्थित कृषी अधिकारी यांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उपयोग कृषी अधिकारी यांनी करून घेऊन शेतकऱ्यांसाठी काम करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी श्री विलास नलगे यांनी केले. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रवीण देशमुख, दत्ता वंजारी, गणेश घुले, रामा लांडगे, अंकुश शिरसागर, कचरू पाबळे यांची खूप मदत झाली.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण निबे तर आभार इंजि. राहुल पाटील यांनी मानले.

