पळसदेव येथे अकोला वि. का. से. सो. च्या संचालक निवडणुकीत अशोक शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ज्ञानदेव शिंदे बिनविरोध झाल्याबद्दल दोघांचा केला सत्कार .
इंदापूर प्रतिनिधी:अकोले विविध कार्यकारी सेवा सोसायटी ची निवडणूक प्रक्रीया जाहीर झाली असून दिनांक १३ मे २०२२ ते ३१ मे २०२२ पर्यंत फॉर्म काढण्याची मुदत असून १२ जून २०२२ रोजी सदर सोसायटीचे निवडणूक मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे. या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून ज्ञानदेव शिंदे व अशोक शिंदे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराची दोन्ही उमेदवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. सदर दोघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडूरंग पाटील व तुकाराम शिंदे यांनी दोघांमधील संगणमत घडवून आणले व अशोक शिंदे यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन फॉर्म मागे घेतला. यावेळी ज्ञानदेव शिंदे हे संचालक म्हणून बिनविरोध झाले.
सदर ज्ञानदेव शिंदे व अशोक शिंदे यांचा सत्कार पळसदेव ग्रामपंचायत येथे पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे व पळसदेव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मेघराज कुचेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी त्यांनी दोघांनाही पेढे भरून अभिनंदन केले .
यावेळी शिवसेना इंदापूर विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरज काळे, माजी चेअरमन शामराव दराडे, सुदर्शन घोळवे, सतीश शिंदे त्यांनी उपस्थित होते.

