shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवसंपर्क अभियानामध्ये खा.कृपाल तुमाने व जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचा इंदापूर तालुक्यात दौरा - इंदापूर विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरज काळे यांची माहिती.

शिवसंपर्क अभियानामध्ये खा.कृपाल  तुमाने व जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचा इंदापूर तालुक्यात दौरा - इंदापूर विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरज काळे यांची माहिती.

 इंदापूर तालुक्यात शिवसंपर्क अभियानांतर्गत  जिल्हा परिषद गट व गणा मध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची दौरा भेट.
इंदापूर प्रतिनिधी: शिवसेनेच्या वतीने इंदापूर तालुक्यात शिवसंपर्क अभियानाअंतर्गत तालुक्यातील गट आणि गणांमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जागृती व्हावी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेचे होऊ घातलेल्या निवडणुकी मध्ये शिवसेना पदाधिकारी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्षाच्यावतीने बारामती लोकसभा मतदार सांघा मध्ये रामटेक लोकसभा खासदार कृपाल  तुमाने व  पुणे शिवसेना  जिल्हा प्रमुख  महेश पासलकर व इतर शिवसेना पदाधिकारी व मान्यवर या दौऱ्यानिमित्त भेटी देणार आहेत . सदर दौरा भेट दिनांक २६ मे २०२२ ते २९मे २०२२ या दरम्यान होणार असून पळसदेव पंचायत समिती गणांमध्ये पळसदेव गावात दिनांक २६ मे २०२२  रोजी दुपारी २ ते ५ या वेळात सदर मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती इंदापूर विधानसभा शिवसेना क्षेत्रप्रमुख सुरज काळे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील शिवसेना ही आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पूर्ण ताकतीनिशी सक्षमपणे सर्वच्या सर्व जागा लढवण्याच्या भूमिकेत असून त्यास उभारी देण्याचे काम या शिवसंपर्क अभियानामधून होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
close