shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठळी विकास सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता - निवडणूकीतून १२ उमेदवार तर १बिनविरोध विजयी.

कौठळी विकास सोसायटीवर  राष्ट्रवादी काँग्रेसची  सत्ता - निवडणूकीतून १२ उमेदवार तर १बिनविरोध विजयी.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुका पार पाडत असताना कौठळी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदान प्रक्रिया २२ मे २०२२रोजी पार पडली. यामध्ये एकूण १२ जागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडली. १ जागा बिनविरोध झाली होती. बारा जागांपैकी लागलेल्या निवडणुकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुरस्कृत वाघजाई शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले.
 
विजयी उमेदवार खालील प्रमाणे: रमेश गणपत काळेल, सतीश रामचंद्र खामगळ, ज्ञानदेव बाबा खांडेकर, भारत बाबा मारकड, भिवा पांडुरंग मारकड, विलास तुकाराम मारकड, सुभाष मोहन शिंदे, ज्ञानदेव एकनाथ खामगळ,छाया योगीराज मारकड, संगीता बाळू मारकड, हौसराव विठ्ठल खांडेकर, संतोष नारायण पिसाळ तर प्रमोद मुरलीधर चितारी हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले.

विजयी उमेदवारांची यावेळी गुलालाची उधळण करीत आनंदाचा जल्लोष उत्साहात साजरा करीत  इंदापूर तालुका सोशल मीडिया प्रमुख हमा पाटील , पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव मारकड, सरपंच सौ. राणी हिरामण मारकड, उपसरपंच सुनील खामगळ,  हिरामण मारकड,  रामभाऊ खामगळ,भारत मारकड, गुणवंत मारकड, सुभाष पिसाळ, अशोक मारकड अनिल पवार, आण्णा काळेल,भारत चोरमले, शहाजी खामगळ, संदीपान मारकड, गजेंद्र काळेल, संतोष खांडेकर, कालिदास पाटोळे, विठ्ठल मारकड, किरण मारकड,लाला काळेल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कौठळी गावातील मान्यवर व सभासद यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
close