shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जालना जिल्ह्यातील वाटुर फाटा येथील युवकाची हत्या करून शेततळ्यात फेकून‌ दिले..? पोलिसांनी मात्र हात ओले झाल्यामुळे कुटुंबाचे म्हणणे न ऐकून घेताच गुन्हा नोंदवला..?


पोलिसांनी गुन्हा नोंदवतांना कुटुंबीयांचे म्हणणेच ऐकून घेतले नाही म्हणून वडीलांनी केले, मुख्यमंत्री गृहमंत्री, पोलिस अधीक्षक , सचिवालय यांचेकडे लेखी तक्रार..!

जालना  । प्रतिनिधी :
जालना जिल्ह्यातील वाटुर फाटा येथील वडार समाजाचे  मोजकेच घरे असलेल्या विशाल कल्याण धनवडे वय १८ वर्षं याला हा ठेकेदारी करतो, याच्या कामाचा दर्जा चांगला असल्याने आपल्याला कामे मिळत नाहीत.याला एकदाचे संपवले तर सर्व कामे आपल्याला मिळतील.या राक्षसी भावनेने पेटून उठून येथील धनदांडगे असलेले  कैलास माने व दोन तीन जणांनी विशाल यास उचलून घेऊन त्याला नशायुक्त पदार्थ पाजून त्याला बेशुद्ध पाडले आणि नंतर त्याला आत्महत्या केल्याचे दाखवत शेततळ्यात ढकलून दिले. कारण विशाल हा पोहण्यात  पारंगत होता.त्यामुळे तो आत्महत्या करूच शकत नाही.असे त्यांच्या कुटुंबियांचे स्पष्ट म्हणणे आहे.

 कैलास माने हा विशाल धनवडेला नेहमी धमकी देत होता की येत्या दोन दिवसातच  विशालला खतम करतो. तु कुठेही जा.. पण मी तुला खतम केल्याशिवाय गप्प बसणार नाही.त्यामुळे विशाल मानेच्या दहशतीमुळे अगोदरच भेदरलेल्या अवस्थेत ह़ोता. जेवण करत नव्हता. यामुळे विशाल याने आत्महत्या केलीच नाही तर त्याची हत्या करण्यात आली आहे. असे कुटूंबातील सर्वांचे म्हणणे आहे.

सदर हत्या करणा-यांनी आपले राजकीय वजन वापरून  विशाल याची प्राणज्योत मालवल्यानंतर पोलीसांचे हात ओले करून मिलिभगत करत विशालच्या कुटुंबातील व्यक्ती विशालचे अंत्यसंस्कार करण्यात व्यस्त असताना त्यांच्या परस्पर खोटा गुन्हा नोंद करण्यात आल्या चे समोर येत आहे.

यासाठी मुलाचे वडील नामें कल्याण शंकर धनवडे वय ४६ यांनी अंत्यसंस्कार झाल्यानंतर चुकीचे पध्दतीने नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्याबद्दल आक्षेप घेत सदर पो.स्टे.परतूर येथील गुन्हा नोंद.क्र.२२७/२२ कलम३०६  भा.द.वि.गुन्हयाचा तपास लोकल क्राईम ब्रॅचचे वरीष्ठ पोलीस अधिकारी यांचेकडे वर्ग करण्याबाबतची तक्रार मा.मुख्यमंत्री, मा.ग्रहमंत्री, जालना पोलिस अधीक्षक यांच्या कडे केलेली आहे.

विशालच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्यात येऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी. यासाठी वडार समाज संघटनाकडून‌ व इतर संघटना कडून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार असल्याचे कळते.तरी या तयारी साठी अनेक पदाधिकारी बैठका घेत आहेत.
close