shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुक्या प्राण्यांची तहान भागविण्यासाठी शंभर पाणवठे ; वाघ्या फाऊंडेशनचा पुढाकार । उपक्रमाचा प्रारंभ..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. मंगळवार दिनांक १७ मे २०२२

मुक्या प्राण्यांची तहान भागविण्यासाठी शंभर पाणवठे ; वाघ्या फाऊंडेशनचा पुढाकार । उपक्रमाचा प्रारंभ..!!

अहमदनगर : वाघ्या फाऊंडेशनतर्फे अहमदनगर शहरातील भटक्या मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी १०० पाणवठे तयार करण्यात आली आहे. सावेडीतील पाईपलाईन राेडवर या पाणवठ्यांचा प्रारंभ करण्यात आला. वाघ्या फाऊंडेशनचे अध्यक्ष सुमित वर्मा यांनी यासाठी पुढाकार घेतला.

वर्मा म्हणाले, “दाेन वर्षांपासून प्राण्यांसाठी वाघ्या फाऊंडेशन ही संस्था कार्यरत आहे. भटक्या मुक्या जनावरांना त्यांच्या हक्क अबाधित ठेवण्यासाठी या फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून माणसालाच उष्णतेची दाहकता सहन होत नाही, तर मुके जनावरे यातून कसे सुटतील. त्यामुळे वाघ्या फाऊंडेशनच्या माध्यमातून प्राण्यांना पाणी पिण्यासाठी शहरात १०० सिमेंटचे पाणवठे शहरात ठिकठिकाणी ठेवत आहोत”.

याचाच भाग म्हणून नगर शहरातील पाईपलाईन रोड येथील एकवीरा चौक मधील हॅपी होम्स फर्निचर समोर या उपक्रमाची सुरुवात केली असे प्रतिपादन वाघ्या फाउंडेशनच्या अध्यक्ष सुमित वर्मा यांनी केली. राधिका रणभोर, उषा सोनवणे, सागर ठोके, अमोल कनगरे, सारिका कांगला, राहुल वर्मा, निखील बुरा उपस्थित होते.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close