शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. मंगळवार दिनांक १७ मे २०२२
प्रहार चे आप्पासाहेब ढुस साखर कामगार हॉस्पिटलमध्ये..!!
श्रीरामपूर : ३२ एकर जमीन..
विधवा आईला एकुलता एक मुलगा..
घरात पत्नी आणि दोन लहान मुले..
काबडकस्ट करून आठ एकर कांदा पिकवला..
आणि .., कांद्याला १ रुपया क्विंटल भाव मिळाला..
श्रीरामपूर तालुक्यातील टाकलीभान ची घटना..
भरत गंगाराम जाधव वय ३५, यांनी व्यथित होऊन उचलले टोकाचे पाऊल..
साखर कामगार हॉस्पिटलमध्ये प्रहार चे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी भरत जाधव यांची भेट देऊन विचारपूस केली..
सोबत होते माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील आणि शेतकरी संघटनेचे युवराज जगताप..
सर्वांनी मिळून भरत जाधव यांना धीर दिला..
अजून गुन्हा दाखल नाही असे समजले..
प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजित दादा पोटे यांना फोन करून जाधव यांचेशी बोलणे करून दिले, त्यांनी माहिती घेऊन तात्काळ पोलिसात निवेदन देण्यास सांगितले..
पोलिस उप अधीक्षक संदीप मिटके साहेब यांना फोन करून कार्यवाही करणेस विनंती केली.. त्यांनी विनंती मान्य केली.लवकरच संबंधितांवर कारवाई होणार..
जय प्रहार.......
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

