अहमदनगर जिल्ह्यामध्ये आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर परिषद या निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. आमदार विनायकराव मेटे साहेब यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा नगर येथील हॉटेल सनी पॅलेस येथे रविवार दि 15 मे रोजी संपन्न झाला. या मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. आ. श्री. विनायकरावजी मेटे साहेब यांच्या हस्ते आणि मा. श्री. सुरेशराव शेटे पाटील,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष, मा. श्री. शेखर पवार साहेब, अहमदनगर जिल्हा पक्षनिरीक्षक आणि अहमदनगर जिल्ह्यातील इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कांगोणी ता. नेवासा येथील सामाजिक कार्यकर्ते सोपानराव रावडे यांची नेवासा तालुका उप अध्यक्ष, शिवसंग्राम संघटना या पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील सर्व अधिकार्यांनी मुख्यालयी राहण्याबाबतच्या दि ९ सप्टेंबर २०१९ च्या शासननिर्णयाची अंमलबजावणी व्हावी, दि ९ सप्टेंबर २०२० रोजीच्या कृषि विभागाच्या शासननिर्णयानुसार शेतकर्यांच्या हितासाठी अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ग्राम कृषि विकास समितीची स्थापना करावी यासाठी शासनाकडे सोपान रावडे यांचा पाठपुरावा यापूर्वी चालू होता आता येथून पुढे या व इतर कोणतेही सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सोपान रावडे यांनी सांगितले आहे.

