shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व प्रदीप गारटकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन.

इंदापूर येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व प्रदीप गारटकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन.
 इंदापूर प्रतिनिधी: राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व संघर्ष योद्धा पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर नगरपालिका या ठिकाणी भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन लक्ष्मण तात्या देवकते पाटील मित्र परिवार यांच्यावतीने दि.२१मे २०२२ते २२मे २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे.


या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मोहोळ तालुक्याचे आमदार  यशवंत  माने व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव  देवकाते पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

 यामध्ये प्रथम पारितोषिक रुपये ५१ हजार रुपयाचे हनुमंत कोकाटे, नवनाथ रुपनवर, सिताराम जानकर यांच्याकडून देण्यात आलेले आहे. द्वितीय पारितोषिक ३१ हजार रुपये दीपक  जाधव यांच्याकडून देण्यात आलेले आहे. तृतीय पारितोषिक बाळासाहेब ढवळे यांच्याकडून२१ हजार रुपये तर चौथे पारितोषिक २१ हजार रुपये नंदू गायकवाड यांच्याकडून देण्यात येणार आहे. 

उत्कृष्ट खेळाडू ५ हजार रुपये शिवाजी तरंगे, उत्कृष्ट चढाई ५ हजार रुपये तेज पृथ्वी ग्रुप च्या वतीने व बाळासाहेब नरूटे उत्कृष्ट पकड ५ हजार रुपये पोपट शिंदे व शत्रुघन शिंदे यांच्याकडून देण्यात येणार आहे.

 कार्यक्रमासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा व इंदापूर तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य इंदापूर नगरपालिका नगरसेवक नगरसेविका कृषी उत्पादन बाजार समिती पदाधिकारी मार्केट कमिटी पदाधिकारी सर्व सोसायटीचे चेअरमन संचालक मंडळ सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन  लक्ष्मण  देवकाते पाटील यांनी केलेले आहे.
close