इंदापूर तालुका भाजपच्या तालुका उपाध्यक्ष पदी रणजीत वाघमोडे तर कामगार आघाडी सहसंयोजक पदी समाधान देशमुख आणि वाहतूक आघाडी सहसंयोजक पदी अमोल सुळ व युवा मोर्चा सदस्यपदी किशोर खटके यांची निवड.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने नुकताच पदग्रहण समारंभ इंदापूर येथे संपन्न झाला.
यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते रंजीत वाघमोडे यांना इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्षपदी निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच कामगार आघाडी सहसंयोजक पदी समाधान देशमुख यांनाही पत्र देण्यात आले. त्याच बरोबर वाहतूक आघाडी सहसंयोजक पदी अमोल सुळ व किशोर खटके यांची युवा मोर्चा सदस्यपदी निवड करण्यात आली त्यांचे हे पत्र या वेळी देण्यात आले.
भारतीय जनता पार्टी प्रति असणारी निष्ठा व प्रामाणिकपणा पाहून सदर पदासाठी निवड करण्यात आली असून यापुढे पक्ष वाढीसाठी सक्रिय राहावे. पक्षाच्या कामात मोठा सहभाग नोंदवावा . पक्षाच्या लहान-मोठ्या बैठका मेळावे परिसंवाद जाहीर सभा यासाठी आपली उपस्थिती आवश्यक राहील. पक्षाने आपल्यावर दिलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून आपण पक्ष वाढीसाठी अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठेने काम करावे. पक्षाचे काम करताना भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वांना बरोबर घेऊन सर्वांचा विश्वास संपादन करून काम करावे अशा आशियाचे नियुक्तीपत्र इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शरद जामदार यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते वाघमोडे, देशमुख व सुळ आणि खटके यांना दिले.

