shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी ब्रू सोसायटी चेअरमन पदी निवडबद्दल निलेश बोडके यांचा अमोलराजे इंगळे यांनी केला सत्कार

पिंपरी ब्रू सोसायटी चेअरमन पदी निवडबद्दल निलेश बोडके यांचा  अमोलराजे इंगळे यांनी केला सत्कार.

 बाभूळगाव सोसायटीचे सर्व संचालक निवडून आल्याबद्दल अमोलराजे इंगळे यांचा नीरा-भीमा कारखान्याचे संचालक संजय बोडके यांनी केला सत्कार.


इंदापूर प्रतिनिधी:पिंपरी बुद्रुक विकास सोसायटी चेअरमन पदी निलेश  बोडके यांची निवड झाल्याबद्दल पिंपरी येथे अमोलराजे  इंगळे यांनी  सत्कार करून अभिनंदन केले 
यावेळी पिंपरी बुद्रुक विकास सोसायटीचे पॅनल प्रमुख भाजपचे ज्येष्ठ नेते व नीरा-भीमा कारखान्याचे संचालक संजय बोडके आणि चेअरमन निलेश बोडके यांनी बाभूळगाव  सोसायटीचे सर्व १३ उमेदवार निवडून आल्याबद्दल पिंपरी बुद्रुक गावच्या वतीने अमोलराजे इंगळे यांचा सत्कार  अभिनंदन करून भावी जिल्हा परिषदच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी अमोलराजे इंगळे म्हणाले की, पिंपरी बुद्रुक विकास कार्यकारी सेवा सोसायटी ही मोठी असून या सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याद्वारे आर्थिक हातभार लागत असतो. अशा सोसायटीच्या चेअरमन पदी निलेश बोडके यांची निवड झाली असल्याने ते या सोसायटीच्या सभासद शेतकऱ्यांना  नक्कीच सोसायटीच्या माध्यमातून सेवा देतील.

तसेच इंगळे यांनी त्यांच्या सत्काराला उत्तर देताना म्हटले की,सत्काराचे खरे मानकरी बाभुळगाव विकास सोसायटीचे सर्व सभासद व पॅनल प्रमुख कल्याण बापू गुरगुडे, भास्कर आबा गुरगुडे, तसेच आमचे मोठे बंधू राजाभाऊ इंगळे आणि सोसायटीचे १३ उमेदवार हे सत्काराचे मानकरी आहेत. इथून पुढे किमान २० वर्ष तरी बाभूळगाव ग्रामपंचायत व सोसायटी वरती विरोधकांचा झेंडा कधी लागणार नाही. बाभूळगाव ग्रामपंचायत आणि विकास सोसायटी ही हर्षवर्धन पाटील  आणि आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत. असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी राजेंद्र मगर, प्रदीप बोडके, तुषार बोडके, दत्तात्रय बोडके, कल्याण भंडलकर, सतीश बोडके, अविनाश बोडके, बाळू पडळकर, अजित गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.
close