कोपरगाव :- आज मे महिन्याचा मध्यान्ह.. सूर्यनारायण आग ओकत आहे.. विहीरीतील पाणी आटत चालले.. विज मंडळ शेतीला वीज देत नाही.. अशा सर्कशीतही शेतकरी ऊस शेती करतो...!
साखर कारखाने परिसरात बाहेरून ऊस आणत होते.. कारणे त्यांनाच माहिती.. स्थानिक शेतकरी उन्हाळ्यात पोटच्या मुला सारखे ऊसाला जपत होते.. जेवढे पाणी नियमित भरले जाईल तेवढे ऊसाचे वजन वाढणार.. म्हणून वजन कमी न होऊ देण्याकरिता शेतकरी प्रयत्न करतो.
विशिष्ट वयात ऊस तुटला तर ऊसाला वजन भरते... पण कारखानदार ऊस परिपक्व झाल्यानंतर दोन दोन महिन्याने ऊस नेतात.. त्यामुळें शेतकऱ्यांना वजनात नुकसान सोसावे लागते..
ऊस तोडणी कामगार ऊस प्रति टन दराने तोडतात... वहातुकदार प्रती टन वाहतात... ऊसाचे संपूर्णतः वाढे ऊस तोडणी कामगार घेऊन जातात.. त्याचे विकुन मजबुत पैसे कामगार कमवतात.. आता ह्या वर्षी ऊस तोडणी साठी शेतकऱ्यांना अतिरिक्त पाच हजार रुपये प्रती एकर द्यावे लागतात..!
आता ऊस तोडणी पूर्वी ऊस तोडणी कामगार शेतकऱ्यांनी तळ हाताच्या फोडा प्रमाणे जपलेला ऊस पेटवून देऊन नंतर तोडण्याची प्रथा पाडली...
भयानक आगीत ऊस होरपाळतो.. त्यामुळें ऊसाचे वजन पंचवीस ते तीस टक्के कमी होते..
जळाल्यामळे जमीन होरपळून निघते.. जमीनीतील शेतकऱ्याने तयार केलेले जिवानू मरतात..ऊस तोडणी पुर्वी महिनाभर अगोदर पाणी तोडल्याने ऊसाचे वजन कमी होते.. ऊस जळाल्याने ऊसातील पाणी कमी होऊन साखर उतारा वाढतो.. त्यामुळें साखर कारखानदार ऊस जाळून तोडणी करण्याकरता प्राधान्य देत आहे.. विरोध करीत नाही..!
ऊस जाळून तोडणे म्हणजे साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या प्रपंचाची होळी करत आहे... आज सकाळी ऊस जळत असताना शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या डोळ्यातील आसवं मी बघीतली...
खरच साखर कारखानदार इतके क्रूर झालेत.. शेतकऱ्यांना रक्ताचे आसवं गाळायला लावतांत... हे तर तस्कर च झालेत... सकाळी सकाळी जळणाऱ्या ऊसाचे क्षणचित्र मी स्वत: टिपले होणाऱ्या पर्यावरणीय हाणुला साखर कारखानदारच जबाबदार कुंपनच शेत खातंय न्याय कुणाकडे मागायचा.
तालुक्याचे पगारी व पेन्शनर आमदार शेतकऱ्यांना न्याय देणार काय? कि साखर कारखान्याच्या दोन टक्के साखर उतारा वाढीसाठी शेतकऱ्याच्या प्रपंचाचा जाळ करण्याची नवीन परंपरा विकसित करणार?
संजय भास्करराव काळे, कोपरगाव.

