शिर्डी । प्रतिनिधी ( संजय महाजन) :-
सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या श्री साईबाबांची भूमी शिर्डी शहरात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स ,श्री साईबाबा सेवा संस्थान व अहमदनगर जिल्हा तेली समाज तसेच शिर्डी ग्रामस्थ आयोजित सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता , यावेळी ११ जोडपे उपस्थित मान्यवरांच्या शुभ आशीर्वादाने विवाह बद्ध झाले मोठ्या धूम धडाक्यात हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला ,
ॲड.डॉ विक्रांत वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तेली समाजाने इतर समाजासाठी आयोजित करण्यात आला हा तेली समाजातील इतिहासातील पहिलाच सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आहे. यावेळी अॅड.वाघचौरे म्हणाले की, हा सामुदायिक विवाह सोहळा हा सर्वसामान्य लोकांचा, श्री साईबाबांचा सबका मलिक एक या संदेशा प्रमाणे सर्व धर्म समभावाचा हा मंत्र प्रत्यक्षात उतरविण्याचे काम या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून केल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले.
या अभूतपूर्व विवाह सोहळ्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात झाली , यावर्षी पेक्षा उत्कृष्ट नियोजन पुढील वर्षी करू असे विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष बद्रीनाथ लोखंडे यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री अविनाश दंडवते विश्वस्त साईबाबा संस्थान शिर्डी, विजयभाऊ रत्नपारखी कार्याध्यक्ष सुदुंबरे संस्थान व उपाध्यक्ष प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य, राजेंद्र शिंदे उप महापौर ठाणे शहर, गणेश वाघचौरे राष्ट्रीय सरचिटणीस , संतोषशेठ माकुडे, गणेश पिंगळे, सागरशेठ व्हावळ, विवेक साळवी मुंबई, मनसे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे,अॅड अमित महाले, कमलाकर कसबे सर,श्री नानाजी भोत,विलासराव दुर्गुडे,सुरेशराव नागले,नामदेव वाघचौरे,अशोक वालझाडे, सिमोन जगताप जिल्हाध्यक्ष भीमशक्ती, अॅड.अविनाश शेजवळ युवक काँग्रेस, अमर गायकवाड, रवी कोलकर, विजय मकासरे,राजू पांचाळ,राकेश भोकरे, जुबेर शेख,रंजना शिंदे, तारकेश्वरी वालझाडे, वैशाली देशमाने, रीना वालझाडे , अनिता लुटे, अॅड.माधुरी लुटे,वैशाली लुटे, हर्षदा वाघचौरे, रोहिणी लोखंडे, शशिकांत महाले, विठ्ठल लुटे,संतोष शेलार,देविदास कहाणे,सागर राऊत,विजय खंडागळे,योगेश घाटकर,रतन चौधरी आदी वऱ्हाडी मंडळी सह मोठ्या संख्येने शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभाचे आयोजक विश्वस्त सचिन लोखंडे यांनी सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा बद्दल माहिती दिली, हजारोंच्या संख्येने गाडीघोड्यावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली,यावेळी संसार उपयोगी वस्तू , वधू वर पोशाख, सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे, पाच भांडे ,भेटवस्तू वधू वराना देण्यात आली , वऱ्हाडी मंडळाला मिष्टान्न भोजन देण्यात आले . दि १३ मे २०२२ रोजी साई पालखी निवारा शिर्डी येथे पार पडलेल्या ११ जोडप्यांचे हिंदू धर्म संस्कृती प्रमाणे विवाह मंत्रोच्चारात म्हणून पार पाडले पौरोहित्य श्री लावर गुरुजी यांनी केले.कन्यादान बद्रीनाथ लोखंडे आणि रोहिणी लोखंडे यांनी केले, प्रास्ताविक ॲड.विक्रांत वाघचौरे यांनी केले तर सूत्रसंचालन कमलाकर कसबे यांनी केले आभार सचिन लोखंडे यांनी मानले.

