shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वृक्षारोपणाचा देखावा व वृक्ष जगविण्याची, संवर्धनाची हमी या बाबतची आचारसंहिता हवी..!

१४२) पर्यावरण जनजागरण आणि आरोग्य साक्षरता

वृक्षारोपणाचा देखावा व वृक्ष जगविण्याची, संवर्धनाची हमी या बाबतची आचारसंहिता हवी

थेंबे थेंबे तळे साचे
बोलणारांचे काय जाते?
कोटी कोटी झाडे लावा
पावसाळा जवळ आला

मिडीयावरती गप्पा मारा
वृक्षारोपण साजरं करा
दरवर्षी लावली झाडे
डोंगर तरीही उजाड सारे

डोंगरावरची निलगिरी 
उजाड करते पानथळी
काय आणि कुठे लावा
याचं पहीलं शिक्षण द्या

स्वतः पुरत झाडं लावा
पाणी घालून मोठं करा
स्वतः पुरती करा सावली
घरीच फुलवा निसर्ग माऊली

उगाच खड्डे उगाच पाणी
कुठलीच झाडं जगत नाही
सरकारी पैसा नका करू खर्च
सगळेच श्रम जातात व्यर्थ

सरकारने तर असे करावे
वृक्षप्रेमींना पैसे द्यावे
जे जे जगवतील वृक्ष वेली
त्यांचीच जपावी मांदियाळी

उगाच सोहळे पर्यावरण
उगाचच नको वृक्षारोपण
वार्षिक फोटो नको समारंभ
वृक्षारोपणाचा नकोची दंभ

अजूनही एक उपाय योजावा
जे करीती वृक्षारोपण देखावा
त्यांची झाडे मेली की दंड लावा
पहा कसे वाटते?

वृक्षारोपणाची वार्षिक थट्टा
तापमानवाढीचा बसतोय फटका
किती किती लावली झाडे
उजाड डोंगर वणव्यात मेले

पक्षी, प्राणी, पाखरे, झाडे
वणव्यामध्ये करपून गेले
सर्प, जीवजंतूंचे वैवीद्य संपले
सारे सारे आम्हीच केले

आता तरी विचार करा हो रास्त
उजाड डोंगरी निसर्ग झालाय फस्त
कारणे वृक्षसंवर्धन प्रामाणिक फक्त
करोनी निसर्ग टिकवावा

थेंबे थेंबे तळे साचे
ऐसेची संतवचन जपावे
प्रत्येकाने आपुल्या परीने करावे
वृक्षवेलींचे संवर्धन!

रचनाकार :
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने. मो. ९८८१३७३५८५
(नावानिशी अन्यत्र प्रकाशित करावयास हरकत नाही)

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या पर्यावरण जनजागरण व आरोग्य साक्षरता उपक्रमांतर्गत प्रकाशित. 
लेखक : 
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने 
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
close