शिर्डी । प्रतिनिधी :
श्री साईबाबा सेवा संस्थान, अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स शिर्डीच्या वतीने शुक्रवार दिनांक 13 मे 2022 रोजी दुपारी 12:36 वा. शुभ मुहुर्तावर भव्य आणि दिव्य अश्या शिर्डी शहरातील तील श्री साई पालखी निवारा निघोज (शिर्डी) येथे 1 ल्या सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभु श्री सद्गुरू साईनाथ महाराज आणि संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पावनभुमी मध्ये मागील १ वर्षा पुर्वी "श्री साईबाबा सेवा संस्थान, अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स" ची स्थापना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वारसा जोपासण्याच्या बांधिलकीतुन करण्यात आली. पहिल्याच वर्षात महाराष्ट्र राज्यातून सर्वाधिक गरीब कुटुंबातील भगिनींचे विवाह सामुदायीक विवाह सोहळ्यांतर्गत करून त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याचा मानस आहे तरी आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच प्रतिवर्षी सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा नित्याचा उपक्रम यापुढं होणार असला तरी या वर्षीच्या या सोहळ्याचे वेगळे महत्व आहे.
कधी नव्हे ते महाराष्ट्र राज्यामध्ये भीषण महागाईचे संकट , कोरोना काळ ,बेरोजगारी सर्वसामान्य माणसाला भेडसावत आहे. पिण्याला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, हाताला काम नाही अशा परिस्थितीत जगावं कस असा मोठा प्रश्न जनतेसमोर असताना वयात आलेल्या मुला-मुलींचे लग्न करावे कसे या चिंतेने बळीराजा शेतकरी ग्रासला आहे. म्हणुनच आम्ही या वर्षीच्या या सोहळ्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुला-मुलींचे आणि दुष्काळामुळे होरपळणाऱ्याy शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या मुला-मुलींचे विवाह भव्य सोहळ्यात करून देण्याचा मानस केला आहे. आपल्या भागातील माणसांसाठी बळीराजाला दिलासा देण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमात आवश्यकता आहे ती आपल्या सर्वांच्या सहकार्याची आणि आशीर्वादाची, त्यासाठी या विवाह सोहळ्याला आपल्या घरचे कार्य आहे असे समजून सहकार्य करावे, सहभाग घ्यावा तसेच वधु-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे हि नम्र विनंती आहे असे
.डॉ विक्रांत सिद्धेश्वर वाघचौरे म्हणाले.
सदर सामुदायिक विवाह सोहळ्यास अनेक साधू संत महंत तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहून आपला आशीर्वाद देणार आहे.

