मुंबई - नुकतेच सायन येथील प्रतिक्षानगरमध्ये गुणीजनांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिक्षानगर मुंबई येथील आदिवासींचे कुपोषण या क्षेत्रातील दादा म्हणून प्रसिद्ध असलेले
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, जनसंपर्क क्षेत्रातील तज्ञ व निर्मला निकेतन काॅलेज ऑफ सोशल वर्कचे पीएचडी स्कॉलर प्रा.अनिल गणपत म्हात्रे यांना मुंबई विद्यापीठाचा १६ वा अविष्कार रिसर्च कन्वेन्शन २०२१-२०२२ द्वितीय पुरस्कार जाहीर झाला. तसेच कु.वैष्णवी महेंद्र सागवेकर, एम,पी,एस,सी, डेप्युटी कलेक्टर टॅक्सेशन इंटरव्ह्यू राऊंड उत्तीर्ण झाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल माजी शिक्षण सभापती व नगरसेवक मंगेश सातमकर,नगरसेवक रामदास कांबळे यांच्या हस्ते व रिटाताई वाघ, शाखाप्रमुख, संजय म्हात्रे यांच्या उपस्थितीत शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी इतर मान्यवर उपस्थित होते. श्री.अनिल म्हात्रे व कु. वैष्णवी सागवेकर यांच्या सारख्या गुणीजनांचा आम्हाला अभिमान आहे असे जाहीर वक्तव्य मंगेश सातमकर व रामदास कांबळे यांनी केले. नगरसेवक मंगेश सातमकर हे गेली अनेक वर्षं महापालिकेच्या शिक्षण समितीचे सभापती राहीले आहेत म्हणून या सत्काराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे अशी प्रतिक्रिया अनिल म्हात्रे व वैष्णवी सागवेकर यांनी दिली.
वृत्त संकलन: शौकतभाई शेख, श्रीरामपूर

