shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सौ.निकिता आदित्य नगरकर यांची झी मराठी महा होम मिनिस्टर साठी निवड..!

श्रीरामपूर (शौकतभाई शेख):- सतत दहा वर्षांपासून गाजत असलेल्या झी मराठी महा होम मिनिस्टर मा. आदेश बांदेकर यांच्या मालीका साठी येथील सौ.निकीता आदित्य नगरकर यांची निवड झाली आहे,
महा होम मिनिस्टर आकरा लाख रुपयांची पैठणी जिंका (कापसे पैठणी प्रायोजक) साठी महाराष्ट्र तील प्रत्येक जिल्ह्यातुन नव्वद महिलांची निवड करत त्यातून काही महिलांची निवड करून निवड झालेल्या उमेदवारांमधून प्रत्येक जिल्ह्यातुन आलेल्या महिलांमध्ये स्पर्धा घेऊन विजयी स्पर्धकाला आकरा लाखाची पैठणी मिळणार आहे.

मंगळवार दिनांक १७/०५/२०२२ रोजी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत दोन हजार महिलांनी यामध्ये भाग घेतला त्यात अलिबाग,लातूर, पुणे, औरंगाबाद,नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील सिलेक्टेड प्रत्येक महिलेला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले, त्यात सौ.निकीता आदित्य नगरकर हिचे उत्तर बरोबर आले तसेच दुसऱ्या राऊंडला जनरल नॉलेज विषयी दुसरे प्रश्न विचारण्यात आले त्यातही उत्तर बरोबर आले अशा दोन्ही प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेल्या महिलां मधून लक्की ड्रा काढण्यात आला तर त्यामध्ये सौ.निकिता हिचा पंच्चावण्णावा नंबर आला, बुधवार दिनांक १८/०५/२०२२ रोजी ती झी स्टुडिओत शुटिंगसाठी दाखल झाली आहे.येत्या सोमवारी झी मराठी वाहिनीवर सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम दिसणार आहे. सौ.निकिता नगरकर हीने आजवर विविध कलाक्षेत्रात नैपुण्य मिळविले आहे.

तीचे ठळक असे काही चित्रपट, मालिका,वेब सिरिज इ.पुढील प्रमाणे- १) संत भगवान बाबा, २) कट्टी बट्टी  (झी युवा) ३) लग्नाची वॉईफ वेंडिंग ची बायकू (झी मराठी), मालिकांसोबत,वेब सिरिज - १) गावरान मेवा,चालु नवरा खतरनाक बायको,चित्रपट - १) सगळे करुन भागले,२) संत महिपती,३) इपीतर, शॉर्ट फिल्म - १) एक घास चिऊचा, २) प्रेमाचे रंग अंके,३) कागुद,४) चौकट राणी, प्लाय,स - (राष्ट्रीय स्तर) १) मारली थाप,२) भिकारडे,३) कुंपण,४) चोरुन काय बघता,५) टपोरी साला,६) पार्टनर्स,७) रॅन मेकर्स,८) बाईपण,ड्रामा - १) अवास्तव,२) छोटू,३) रिकामी जागा,४) मेणबत्ती,५) अशानम मनुष्यम (राज्यस्तरीय पदक),६) उदारभरणम,हिंदी ड्रामा - १) और ढम्मी, प्राईझ - १) राष्ट्रीय स्तर बेस्ट एक्टर्स, २) सुवर्ण पदक (ड्रामा)
तरी सोमवार दिनांक २३ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता झी मराठी या वाहिनीवर प्रसारित होणारा हा कार्यक्रम सर्वांनी अवश्य बघावा आणि प्रत्येक महिलेने आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी जरुर प्रयत्न करावा असेही सौ.निकिताने म्हटले आहे.
close