shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापती पदी आदिनाथ धायगुडे यांची तर उपसभापती पदी रामचंद्र शिंदे यांची निवड.

शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापती पदी आदिनाथ धायगुडे यांची तर उपसभापती पदी रामचंद्र शिंदे यांची निवड.


इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्था याची निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने २१- ० अशा पद्धतीने निवडणूक मध्ये विजय संपन्न केला. नवनियुक्त संचालक मंडळाची आज दिनांक ५ मे रोजी सभापती व उपसभापती पदाची निवड निवडणूक निर्णय अधिकारी गावडे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यामध्ये सभापती पदी आदिनाथ धायगुडे यांची तर उपसभापती पदी रामचंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती पदाची सूचना विद्यमान संचालक बालाजी कलवले यांनी मांडले तर त्यास अनुमोदन संचालक संतोष गदादे यांनी दिले.





यावेळी नूतन सभापती व उपसभापती यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की इंदापूर तालुक्यातील सर्व सभासद शिक्षक बंधू-भगिनी च्या हितास प्राधान्य देऊन पतसंस्थेचे कामकाज केले जाईल. तसेच या पतसंस्थेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार नवनियुक्त सभापती आदिनाथ धायगुडे यांनी यावेळी मानले.


यावेळी नानासाहेब नरूटे ,सुहास मोरे ,सतीश शिंदे, दत्तात्रय तोरसकर, सर्जेराव मारकड आदि शिक्षक नेते गण तसेच  दत्तात्रय ठोंबरे ,शशिकांत शेंडे ,प्रशांत घुले ,बालाजी कलवले, सतीश दराडे, भारत बोंडे ,अनिल शिंदे ,संतोष गदादे, आदिनाथ धायगुडे ,सदाशिव रणदिवे, सतीश गावडे, संजय मस्के, भाऊसो वनवे, दत्तात्रय चव्हाण ,संतोषकुमार तरंगे ,रामचंद्र शिंदे ,सौ .संजीवनी गरगडे ,सौ. संगीता पांढरे , सचिन देवडे, किशोर वाघ इत्यादी नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.


याप्रसंगी नवनिर्वाचित सभापती उपसभापती व नूतन संचालक यांचा फेटा बांधून सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते दीपक जाधव यांनी केला व सर्वांचे अभिनंदन केले. सुत्रसंचालन संतोष गदादे ,आभार प्रदर्शन सुहास मोरे यांनी मानले.
close