हैद्राबाद येथील पार्थसार्थ रेड्डी साई भक्तांकडुन रु. २ कोटी किंमतीचे ४ किलो सोन्याचे दान
शिर्डी (राजेंद्र दूनबळे):- श्रध्दा और सबुरी आणि सबका मालिक एक शिकवण देणारे श्री साईबाबा यांना हैद्राबाद येथील साई भक्तांकडुन रु.२ कोटी किंमतीचे ४ किलो सोन्याचे दान करण्यात आले आहे,
शिर्डीच्या साईबाबांच्या झोळीत पुन्हा दोन कोटींच्या सोनाचे दान आले आहे.साईबाबांचे सिंहासन सोन्याचे झाले होते ,मात्र मूर्तीच्या खालील चौथरा बाकी होता. त्यास देखिल भाविकाने सोन्याने मढवले आहे. ४ किलो सोन्याच्या पट्टीने बाबांच्या मूर्ती खालील भागाला सुवर्णमय करण्यात आले असून आता साईंबाबांचे संपुर्ण सिंहासन सोन्याचे झाले आहे.
सबका मालिक एक शिकवण असलेले शिर्डीतील साईबाबांना भक्त भरभरून दान देत असतात सन २००८ साली तब्बल ११० किलोच्या सोन्यापासून बनविले सिंहासन बसविले गेले होते.आंध्र प्रदेशातील साईभक्त आदिनारायण रेड्डी यांनी हे सोने दान केले होते. साईच्या मुर्तीला सुवर्ण सिंहासन बसविण्यात आले परंतु चौथारा सुवर्णाने मढवण्याचे राहिले होते. त्यासाठीची पट्टी देण्याची ईच्छा साईभक्त पार्थसार्थ रेड्डी यांनी २०१६ मध्येच केली होती. पार्थसार्थ रेड्डी यांनी चार किलो सोन्यापासून अत्यंत सुबक आणि आकर्षक हत्ती, मोर आणि फुलांचे असे पौराणिक नक्षीकाम केलेली ही पट्टी साईच्या मुर्तीच्या चौथऱ्यासाठी तयार करण्यात आली आहे.
हैद्राबाद येथील दानशुर साईभक्त पार्थसार्थ रेड्डी यांनी श्री साईबाबांच्या मुर्तीच्या खालील चौथ-या करीता सुमारे २ कोटी रुपये किंमतीचे ४ किलो सोने देणगी स्वरुपात दिले. सदरची देणगी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे सुपूर्त केली.

