सोमवारी इंदापूर येथे डॉ. वनवे - कृष्णा हाॅस्पिटल मध्ये हाडांचा ठिसुळपणा तपासणी व मार्गदर्शन शिबिर.
एपिओन फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कृष्णा हाॅस्पिटल इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन .
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरातील डाॅ.अतुल वनवे यांच्या कृष्णा हाॅस्पिटल मध्ये सोमवारी दि.३० मे रोजी अत्याधुनिक यंत्राद्वारे हाडांचा ठिसुळपणा तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी या शिबिराचा आवश्य लाभ घेऊन मार्गदर्शन सल्ला घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
एपिओन फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड (EPIONE PHARMACEUTICALS Pvt Ltd.) आणि कृष्णा हाॅस्पिटल इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर शहरातील जुन्या तहसिल कचेरीच्या मागील बाजूस, कसबा परिसरात असणाऱ्या डाॅ.अतुल वनवे यांच्या कृष्णा हाॅस्पिटल मध्ये हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असणारे शिबीर पार पडणार आहे.सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबीर चालणार असून तज्ञ डाॅक्टर रूग्णांना मार्गदर्शन करणार असुन या शिबिराच्या निमित्ताने बोन मिनरल डेनसिटी (BMD) हाडातील खनिज घनता चाचणी व हाडांच्या तक्रारीपासून सुटका करण्यासाठी एक सुवर्ण संधी रुग्णांना उपलब्ध झाली आहे.
कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी (Spondolysis) संधीवात व गुडघेदुखी (Osteorthrities) मणक्याचे व सांध्याचे आजार असणाऱ्या वय वर्ष ३५ व अधिक असलेले स्त्री पुरुष रुग्ण या शिबिराचा लाभ घेऊ शकतात. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी ०२१११-२२३०२२ व ७०७३५६५०५० या भ्रमनध्वनी वर संपर्क साधून आपण पूर्वनोंदणी करू शकता.

