शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक ३० मे २०२२
ट्रकच्या धडकेत दोघे ठार ; नगर-मनमाड माहामार्गावर येसगाव परीसरातील घटना..!!
कोपरगाव : तालुक्यातील येसगाव येथील नगर मनमाड महामार्गांवर रविवारी रात्री 10.54 वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडताना अण्णासाहेब भिमाजी लबडे ( वय 58 ) व त्यांचा सहकारी दत्तात्रय नाना पवार ( वय 57 ) यांना अज्ञात ट्रकन धडक दिल्याने दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. याबाबत कोपरगाव पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरूध् गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीप अंबादास पवार रा . टाकळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आण्णासाहेब लबडे व त्यांचा सहकारी दत्तात्रय पवार हे दोघे काही कामानिमित्त भेटण्यास आले होते. रविवारी रात्री 10.54 वाजेच्या सुमारास ते फिरण्यासाठी म्हणून गेले असता त्यांना रस्ता ओलांडताना अज्ञात वाहांनाने धडक दिली असून त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यातील एक जण जागीच ठार झाला होता.
तर एकास तातडीने उपचारार्थ लोणी येथील रुग्णालायत दाखल केले असता त्यास तेथील उपचार करणार्या वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात वाहनाविरुद्ध फिर्यादी प्रदीप पवार यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आंधळे हे करीत आहेत.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

